सार

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे. निवडणूक काळात प्रचारासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी जगनमोहन रेड्डी यांनी ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा सुरू केली आहे.

Jagan Mohan Reddy :  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. निवडणूक काळात प्रचारासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी जगनमोहन रेड्डी यांनी ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आज (१३ एप्रिल) रात्री विजयवाडा पोहोचल्यावर ते लोकांना अभिवादन करत होते. त्याचवेळी यांच्यावर दगडफेक झाली.

जगनमोहन रेड्डी विजयवाडामधील सिंहनगर येथे रोड शो करत होते. त्यांची ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा तिथे दाखल झाली होती. त्यावेळी बसवर चढून जगनमोहन रेड्डी लोकांना अभिवादन करत होते. तसेच लोकांचा जल्लोष पाहत होते. त्यांचा ताफा विवेकानंद शाळेजवळ पोहोचला. त्याच ठिकणी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. यावेळी एक दगड त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ लागला आणि जखम झाली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सुरक्षारक्षक आणि वायएसआरच्या पदाधिकाऱ्यांनी जगनमोहन रेड्डींना बसमध्ये नेलं. बसमध्येच त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. प्रथमोपचार घेतल्यानंतर जगनमोहन यांनी पुन्हा एकदा लोकांना अभिवादन केलं आणि त्यांची बस यात्रा पुढे नेली.

बसमध्येच प्रथमोपचार घेतले :

दगड फेकत जगनमोहन रेड्डींच्या डोक्याला दुखापत झाली आहे.यावेळी एक दगड त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ लागला आणि जखम झाली. बसमध्येच डॉक्टरांनी जगनमोहन रेड्डींवर प्रथमोपचार केले. प्रथमोपचारानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी त्यांची बस यात्रा चालू केली.

आमदार वेल्लमपल्ली देखील जखमी :

जगनमोहन रेड्डींच्या ताफ्यावर दगडफेक झाली तेव्हा त्यांच्याबरोबर तिथे उपस्थित असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला दगड लागून गंभीर इजा झाली आहे. तिथे उपस्थित पदाधिकारी वेल्लमपल्ली यांना घेऊन त्वरीत रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, वायएसआरसीपीच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, हा हल्ला तेलुगू देसम पार्टीच्या लोकांनी घडवून आणला होता.

आणखी वाचा :

Loksabha Election 2024 : राहुल गांधी यांची राज्यातील पहिली सभा आज, काँग्रेसच्या वादग्रस्त नेत्याच्या मतदारसंघात होणार प्रचाराचा शुभारंभ

MEA ने ट्रॅव्हल ॲडव्हायझरी केली जारी, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीयांना इराण, इस्रायल प्रवास टाळण्याचे केले आवाहन

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाविरुद्ध गुन्हा दाखल, दोघा पांड्या भावांची केली 4 कोटींची फसवणूक