सार

Lok Sabha 5 th phase voting: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 13 मतदारसंघांचा समावेश आहे. 

 

 

 

 

06:13 PM (IST) May 20
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

महाराष्ट्र सरासरी – 48.66 टक्के

भिवंडी 48.89 टक्के

धुळे -48.81 टक्के

दिंडोरी – 57.06 टक्के

कल्याण – 41.70 टक्के

उत्तर मुंबई – 46.91 टक्के

उत्तर मध्य मुंबई – 47.32 टक्के

उत्तर पूर्व मुंबई – 48.67 टक्के

उत्तर पश्चिम मुंबई – 49.79 टक्के

दक्षिण मुंबई - 44.22 टक्के

दक्षिण मध्य मुंबई – 48.26 टक्के

नाशिक - 51.16 टक्के

पालघर – 54.32 टक्के

ठाणे – 45.38 टक्के

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 07.00 वाजेपासून सुरुवात झाली. 31 - मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 44.22 टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील 31- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे..

भायखळा -41 टक्के

कुलाबा -34 टक्के

मलबार हिल - 48 टक्के

मुंबादेवी - 46 टक्के

शिवडी - 48 टक्के

वरळी - 45 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

 

06:05 PM (IST) May 20
उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू असून पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू झालं, पराभव समोर दिसत असल्याने मोदींवर त्यांनी टीका केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांना मतदान होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर विलंब लागत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

 

 

04:27 PM (IST) May 20
सिडकोतील मतदान केंद्रावर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ

सिडको परिसरातील मतदान केंद्रावर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रात जेवणाचे डबे घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले.

 

04:26 PM (IST) May 20
दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 38.77 टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक तर कल्यामध्ये मतदारांचा निरुत्साह

दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

महाराष्ट्र सरासरी – 38.77

भिवंडी 37.06

धुळे -39.97

दिंडोरी – 45.95

कल्याण – 32.43

उत्तर मुंबई – 39.33

उत्तर मध्य मुंबई – 37.66

उत्तर पूर्व मुंबई – 39.15

उत्तर पश्चिम मुंबई – 39.91

दक्षिण मुंबई -36.64

दक्षिण मध्य मुंबई – 38.77

नाशिक -39.41

पालघऱ – 42.48

ठाणे – 36.07

03:45 PM (IST) May 20
धुळे शहरातील मतदान केंद्रावर ऐनवेळी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांमध्ये रोष

धुळ्यातील एल एम सरदार उर्दू हायस्कूल येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. उन्हाच्या प्रचंड तडाख्यातही नागरिकांचा मतदान केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना ऐनवेळी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतदान केंद्रावर येऊन नागरिकांशी साधला संवाद साधला. तसेच बंद पडलेले ईव्हीएम मशीन तात्काळ बद्दलल्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

 

03:21 PM (IST) May 20
राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांच्या 'जय श्रीराम'च्या घोषणा

राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. मोदींच्या आणि जय श्रीरामच्या घोषणा देत वाजे आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्याचे दिसून आले. तसेच हेमंत गोडसे यांच् नावाच्या देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजभाऊ वाजे मतदारसंघात आढावा घेत असताना ही घटना घडली आहे.

 

02:52 PM (IST) May 20
धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.73 टक्के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून सुरुवात झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 28.73 टक्के मतदान झाले आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे ग्रामीण – 31.39 टक्के

धुळे शहर – 27.12टक्के

शिंदखेडा -27.16 टक्के

मालेगांव मध्य – 33.28 टक्के

मालेगांव बाहृय – 26.00 टक्के

बागलाण – 27.45 टक्के

02:51 PM (IST) May 20
महाराष्ट्रात दुपारी एकपर्यंत 27.78 टक्के मतदान

धुळे-२८.७३

दिंडोरी-३३.२५

नाशिक-२८.५१

पालघर-३१.०६

भिवंडी-२७.३४

कल्याण-२२.५२

ठाणे-२६.०५

मुंबई उत्तर-२६.७८

मुंबई उत्तर पश्चिम-२८.४१

मुंबई उत्तर पूर्व-२८.८२

मुंबई उत्तर मध्य-२८.०५

मुंबई दक्षिण मध्य-२७.२१

मुंबई दक्षिण-२४.४६

 

02:49 PM (IST) May 20
मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोगाने मदत करावी : आदित्य ठाकरे

मतदानासाठी अनेक मतदान केंद्रावर मुंबईकर रांगेत उभे आहेत, मुंबईतील मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मदत करावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीये.

 

 

 

01:51 PM (IST) May 20
नवी मुंबईत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रत्येक बूथवर जाऊन केली पाहणी

नवी मुंबई शहरातील ठाणे आणि बेलापूर मतदारसंघांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रत्येक केंद्रावर जाऊन पाहणी केली आहे. मतदान हे सुरळीतपणे पार पडत असल्याची खात्री करून घेतली. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नवी मुंबई शहरामध्ये नाही, शांततेत मतदार पडत आहे. निर्भीडपणे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन मिलिंद भारंबे यांनी केले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई शहरामध्ये मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

 

01:13 PM (IST) May 20
भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्सोवा मतदान केंद्रावर वाद

मुंबईतील वर्सोवामध्ये मतदान केंद्रावर भाजप आणि ठाकरे गटात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. दोन्ही गटांत शाब्दिक चकमक झाल्यानंतर मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी केंद्रावरुन बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे.

12:11 PM (IST) May 20
Maharashtra Lok Sabha Election: राज्यात 11 वाजेपर्यंत 15.93 टक्के मतदान, 8 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी

Maharashtra Lok Sabha Election: महाराष्ट्रातील 13 जागांवर सकाळी 11 वाजेपर्यंत 15.93 टक्के मतदारांनी हक्क बजावला दिंडोरीत सर्वाधिक 19.50 टक्के मतदान झाले. मात्र आठ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी झाले आहे.

महाराष्ट्र सरासरी – 15.93 टक्के

1. भिवंडी – 14.79

2. धुळे – 17.38

3. दिंडोरी – 19.50

4. कल्याण – 11.46

5. उत्तर मुंबई – 14.71

6. उत्तर मध्य मुंबई – 15.73

7. उत्तर पूर्व मुंबई – 17.01

8. उत्तर पश्चिम मुंबई – 17.53

9. दक्षिण मुंबई – 12.75

10. दक्षिण मध्य मुंबई – 16.69

11. नाशिक – 16.30

12. पालघर – 18.60

13. ठाणे – 14.86

12:03 PM (IST) May 20
नाशिक लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांनी केले मतदान

नाशिक लोकसभेच्या उमेदवार भरती पवार यांनी मतदान केले आहे. त्यांनी नाशिक येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

11:10 AM (IST) May 20
उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले मतदान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांचे बंधू तेजस ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

11:08 AM (IST) May 20
अभिनेता सुनिल शेट्टीने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता सुनील शेट्टी याने मतदानाचा हक्क बजावला आहे. 

11:08 AM (IST) May 20
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केले मतदान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मतदान केले आहे. 

11:07 AM (IST) May 20
अभिनेता रणदीप हुड्डाने केले मतदान

अभिनेता रणदीप हुड्डाने मतदानाचा हक्क बजावला आहे. 

10:53 AM (IST) May 20
अभिनेता राहुल बोस यांनी केले मतदान

अभिनेता राहुल बोस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

10:52 AM (IST) May 20
अभिनेता धर्मेंद्र यांनी कुटुंबासोबत येऊन केले मतदान

अभिनेता धर्मेंद्र यांनी पत्नी हेमामालिनी आणि मुलगी इशा यांच्यासोबत मतदान केंद्रावर येऊन मतदान केले आहे. 

10:50 AM (IST) May 20
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले मतदान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.