Voter Education :मतदार यादीत नाव आहे का? आता पाहू शकता एका क्लिक वर, वाचा सविस्तर

| Published : Apr 10 2024, 06:27 PM IST / Updated: Apr 10 2024, 06:28 PM IST

voters list

सार

सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.मात्र मतदार म्हणून आपले हि काही कर्तव्य आहेत.यामध्ये आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे, पण आता हि संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाने ऑनलाईन केली आहे,जाणून घ्या प्रक्रिया काय आहे. 

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 लवकरच सुरू होणार आहे. एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून पहिला टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला तर शेवटचा टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे. त्यानंतर 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. मतदार यादीत आपले नाव आले आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला भटकण्याची गरज नाही. ही माहिती तुम्ही ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारेही मिळवू शकते. होय ! तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही मतदार यादीतील तुमचे नाव आता तीन प्रकारे तपासू शकता.तेही एका क्लिक वर. तर जाणून घ्या मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासायचे .

राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल :

  • तुम्ही नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टलद्वारे ऑनलाइन मतदार यादीतील नाव शोधू शकता. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा…
  • राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइट उघडल्यावर, उजव्या कोपर्यात वरच्या बाजूला इंग्रजी किंवा हिंदीमधून तुमची भाषा निवडा.
  • आता मतदार यादीत शोधा वर क्लिक करा.
  • तुम्हाला 3 पर्याय दिसतील - EPIC द्वारे शोधा, तपशीलांनुसार शोधा, मोबाइलद्वारे शोधा.
  • यापैकी कोणत्याही एकावर जा, तुमचा तपशील भरा, कॅप्चा टाका आणि तुम्हाला मतदार यादीचा तपशील मिळेल.

एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासा :

एसएमएसच्या मदतीने मतदार यादीत नाव पाहता येईल. यासाठी, तुम्हाला नोंदणी क्रमांकाची आवश्यकता असेल, जो तुम्हाला मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करताना मिळाला असेल. यासाठी 10 अंकी EPIC क्रमांक आवश्यक असेल. तुम्हाला EPIC Voter ID क्रमांक टाइप करून 1950 वर एसएमएस पाठवावा लागेल.

मतदार यादीसाठी हेल्पलाइन क्रमांक :

मतदार यादीतील नाव पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर डायल करूनही माहिती मिळू शकते. यासाठी 1950 हा नंबर डायल करा. यानंतर, IVR (इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) ऐका आणि सूचनांचे पालन करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाषा निवडा आणि पुढील सूचना पूर्ण करा. तुम्हाला संदर्भ क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे कळेल.

तुम्हाला कोणती माहिती मिळेल?

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हला महत्वाची माहिती मिळणार आहे .तुम्ही कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे आणि विधानसभा मतदारसंघाचे मतदार आहात हे तुम्हाला समजणार आहे.तसेच तुम्हाला मतदान करण्यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर जावे लागेल? तुमच्या भागात मतदान कधी होणार आहे याचा देखील उल्लेख यामध्ये केलेला आहे.