EVM मशीनची केली पूजा केल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
- Home
- India
- Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Updates : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बजावला मतदानाचा हक्क
Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Updates : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बजावला मतदानाचा हक्क
;Resize=(380,220))
Third Phase Voting Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी आज (7 मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 94 संसदेच्या जागांवर 7 मे ला मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, प्रल्हाद जोशी, सुप्रीया सुळेंसह अन्य बडे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. यावेळी बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालासारख्या काही प्रमुख राज्यांमध्ये मतदान होणार आहे.
- FB
- TW
- Linkdin
EVM मशीनची केली पूजा केल्याने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
देशात 50.71 टक्के मतदानाची नोंद
देशातील दुपारी तीन वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी 42.63% मतदानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 63.11% मतदानाची नोंद झाली आहे. आसाममध्ये देखील 63.08 टक्के मतदान झालं आहे
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बजावला मतदानाचा हक्क
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत झाले 31.55% मतदान
महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत झाले 31.55% मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या चरणासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 39.92% मतदान झाले.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या तिसऱ्या चरणासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 39.92% मतदान झाले.
गोवा येथील भाजप उमेदवार पल्लवी डेम्पो यांनी मतदान केले आहे.
गोवा येथील भाजप उमेदवार पल्लवी डेम्पो यांनी मतदान केले आहे.
अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अहमदाबाद येथे बजावला मतदानाचा हक्क
अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अहमदाबाद येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बजावला मतदानाचा हक्क
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदानाचा हक्क कर्नाटकातील कलबुर्गी येथून बजावला आहे. कलबुर्गी येथून भाजपाने उमेश जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात खरगेंच्या विरोधात उभे केले आहे.
कर्नाटकातील भाजपाचे नेते के.एस. ईश्वरप्पा यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क
कर्नाटकातील भाजपाचे नेते के.एस. ईश्वरप्पा यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे.
बारामती येथील शरद पवारांच्या गटातील उमेदवार सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क
बारामती लोकसभा मतदारसंघातील शरद पवारांच्या गटातील उमेदवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी मतदान केले आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.57 टक्के मतदान
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.57 टक्के मतदान झाले आहे.
- आसाम - 10.12 टक्के
- बिहार - 10.03 टक्के
- छत्तीसगड - 13.24 टक्के
- दादरा नगर हवेली आणि दमण-दीव - 10.13 टक्के
- गोवा - 12.35 टक्के
- गुजरात - 9.87 टक्के
- कर्नाटक - 9.45 टक्के
- मध्य प्रदेश - 14.22 टक्के
- महाराष्ट्र - 6.64 टक्के
- उत्तर प्रदेश - 11.63 टक्के
- पश्चिम बंगाल - 14.60 टक्के
केंद्रीय मंत्री आणि भाजपा उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले मतदान
केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातील भाजपा उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मतदान केले आहे.
अमित शाहांनी सपत्नीक अहमदाबादमधील कामेश्वर महादेव मंदिरात केली पूजा
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्नीसह अहमदाबादमधील कामेश्वर महादेव मंदिरात पूजा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पत्नी आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पत्नी आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदान केले आहे. यावेळी अजित पवारांची आई आशा पवारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथील मतदान केंद्रावर केले मतदान
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे. बारामती येथून शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामती मधून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत.
अभिनेता रितेश देशमुख याने लातूर येथे केले मतदान
अभिनेता रितेश देशमुखने मुंबईहून लातूर येथे दाखल होत मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर रितेशने म्हटले की, प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. सर्वजण मतदान करतील असा विश्वास आहे.
मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार शिवराज सिंह चौहान यांनी परिवारासह केले मतदान
मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार शिवराज सिंह चौहान यांनी परिवारासह मतदान केले आहे.
उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले मतदान
उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मतदान केले आहे.
माझ्या कामावर विश्वास असल्याने नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मला पाठिंबा दिलाय - काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे
सोलापूर मतदारसंघात गेल्या दोन महिन्यांपासून फिरत होती. यावेळी कळले की, भाजपावर नागरिक संतप्त असून त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. मी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहे. माझ्या कामावर विश्वास असल्याने नागरिकांनी मला पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदान केल्यानंतर दिली आहे.
सोलापूर मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले मतदान
काँग्रेसच्या सोलापूर मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मतदान केले आहे. सोलापूर येथून भाजपाने राम विठ्ठल सातपुते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.