सार

निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक निवडणूक आश्वासने दिली आहेत. यामध्ये पीएम सूर्या घरकडून मोफत रेशन, पाणी, गॅस कनेक्शन, शून्य वीज बिल अशा आश्वासनांचा समावेश आहे.वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आहे.यामध्ये गरीब ते श्रीमंत नागरिकांनाच विचार करण्यात आला असून "मोदी की गांरटी" संकल्प पत्र असे नाव देण्यात आले आहे. 

1. गरीब कुटुंबांसाठी मोदींची आश्वासने 

पुढील 5 वर्षांसाठी मोफत रेशन देण्यात येणार आहे. आम्ही 2020 पासून 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन पुरवले आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आम्ही पुढील पाच वर्षे मोफत रेशन देणार आहे.

2 - मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देत राहू

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आम्ही गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा दिली आहे. आयुष्मान भारत आणि अशा इतर उपक्रमांना बळ देऊन आम्ही मोफत आरोग्य उपचार देणार आहोत.

3. वीज बिल शून्य करणार

वीज बिल शून्यावर आणण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर बिलजी योजना सुरू करण्यात येणार आहे. घरात मोफत वीज, तसेच अतिरिक्त विजेचे पैसेही दिले जाणार आहे.

4. 3 कोटी लखपती दीदी तयार करणार

लखपती दीदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशातील लाखो महिलांना सक्षम केले असून भविष्यातही ही योजना सुरू राहणार आहे. महिलांसाठी कल्याणकारी योजनांसह महिला सहाय्यक गटांना मदत दिली जाणार आहे. त्यानुसार ३ लाख लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट.

5 .सेवा क्षेत्रात एसएचजी महिलांचे सक्षमीकरण

आम्ही महिला स्वयं-सहायता गटांना कौशल्ये आणि साधनांसह सक्षम करत आहोत जसे की, आयटी, आरोग्य सेवा, शिक्षण आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये उत्पन्न वाढेल . आम्ही एक जिल्हा एक उत्पादन , शेतकरी उत्पादक संस्था , एकता मॉल, ONDC, GeM, एक स्टेशन एक उत्पादन यासारख्या चालू उपक्रमांसह महिला स्वयं-सहायता गटांना समाकलित करू, ज्यामुळे त्यांना बाजारपेठेच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.

6 . 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला मोफत उपचार 

70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला, मग तो गरीब असो वा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय. त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार असल्याचे देखील यात नमूद केले आहे.

7 . कामगारांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे

सध्या महिलांचा कंपनीमधील वाढत सहभाग पाहता त्यांना सुविधा पुरविणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी महिलांना वसतिगृहे, क्रॅच इत्यादी पायाभूत सुविधा विकसित करणार आहोत.

8. महिलांचे आरोग्य सुनिश्चित करणे

महिलांचे निरोगी जीवन सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही ॲनिमिया, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारखे आज कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तसेच या आरोग्य सेवांचा विस्तार देखील केला जाणार आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दूर करण्यासाठी आम्ही एक उपक्रम सुरू करू.

9. नारी शक्ती वंदन कायद्याची अंमलबजावणी

बहुप्रतिक्षित नारी शक्ती वंदन कायदा लागू केला आहे. संसद आणि राज्य विधानमंडळांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आम्ही याची पद्धतशीर अंमलबजावणी करू.

10 . पारदर्शक सरकारी भरती आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी

देशभरात भरती प्रक्रिया रोखण्यासाठी तसेच याबद्दल घडणाऱ्या गैर प्रकाराला आळा घालण्यासाठी आधीच कडक कायदा करण्यात आला आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही या कायद्याची कडक अंमलबजावणी करणार आहोत.

11. सरकारी सेवा घरोघरी पोहोचवणे

ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा लाभ आणि इतर अत्यावश्यक सरकारी सेवांचा अखंड लाभ सुनिश्चित करण्यासाठी आम्ही पोस्टल आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातुन घरोघरी सेवा पुरवली जाणार आहे.

12. PM किसान योजना बळकट करणे

आम्ही PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ₹6,000 ची वार्षिक आर्थिक मदत देत आहे. तसेच पुढेही हि योजना देण्यासाठी भाजपचे सरकार कटिबद्ध आहे.

13. पीएम फसल विमा योजनेचे बळकटीकरण

जलद आणि अधिक अचूक मूल्यांकन, जलद पेमेंट आणि त्वरित तक्रारीचे निराकरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिक तांत्रिक हस्तक्षेपांद्वारे पीएम फसल विमा योजना अधिक मजबूत करू

14. एमएसपीमध्ये वाढ

प्रमुख पिकांसाठी एमएसपीमध्ये अभूतपूर्व वाढ करणार. आम्ही एकात्मिक नियोजन आणि कृषी-पायाभूत सुविधा प्रकल्प जसे की साठवण सुविधा, सिंचन, ग्रेडिंग आणि वर्गीकरण युनिट, शीतगृह सुविधा आणि अन्न प्रक्रिया यांच्या समन्वित अंमलबजावणीसाठी कृषी पायाभूत सुविधा अभियान सुरू करणार.

15. कृषी पायाभूत सुविधा अभियान

आम्ही एकात्मिक नियोजन आणि कृषी-पायाभूत प्रकल्प जसे की साठवण सुविधा, सिंचन, प्रतवारी आणि वर्गीकरण युनिट, शीतगृह सुविधा आणि अन्न प्रक्रिया यांच्या समन्वित अंमलबजावणीसाठी कृषी पायाभूत सुविधा अभियान सुरू करू.

16. सिंचन सुविधांचा विस्तार

 पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेअंतर्गत २५.५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आहे. याव्यतिरिक्त, कार्यक्षम पाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्यासाठी तंत्रज्ञान-सक्षम सिंचन उपक्रम सुरू करणार.

17. कृषी उपग्रह प्रक्षेपित करणे

पीक अंदाज, कीटकनाशके वापरणे, सिंचन, मातीचे आरोग्य आणि हवामान अंदाज यासारख्या कृषी संबंधित क्रियाकलापांसाठी स्वदेशी भारत कृषी उपग्रह प्रक्षेपित करण्यावर भर.

18. 3 कोटी घरे बांधणार

देशात आणखी 3 कोटी नवीन घरे बांधली जातील. सर्व घरांसाठी गॅस पुरवठा हा पाइपलाइन द्वारे केले जाणार आहे.

19. मुद्रा योजनेची मर्यादा 20 लाख

मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. तृतीय पंथियांना आयुष्मान भारत योजने अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत.

20. एआय आणि अवकाश क्षेत्रात भारत अग्रेसर होईल

आगामी काळात भारत अवकाश, AI, क्वांटम, ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर आणि EV तंत्रज्ञानात अग्रेसर होईल. भारतात 5G चा विस्तार केला जाईल आणि 6G तंत्रज्ञान विकसित केले जाईल. 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण केले जाईल.

21. रेल्वेतील वेटिंग लिस्टची पद्धत संपवणार; बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करणार

आगामी काळात रेल्वे आणि विमानतळांचा आणखी विकास केला जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रतीक्षा यादीची पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, महामार्ग, जल मेट्रोचा विकास केला जाईल. उत्तर-दक्षिण आणि पूर्व भारतात बुलेट कॉरिडॉर तयार केला जाईल.

22. वन नेशन वन इलेक्शन लागू करणार

भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भारतीय न्यायिक संहिता लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. वन नेशन वन इलेक्शन आणि कॉमन इलेक्टोरल रोल अशी व्यवस्था तयार करण्याचे आश्वासन दिले आहे.

23. 2025 हे आदिवासी अभिमानाचे वर्ष म्हणून साजरे होणार

भाजपने मोदींच्या हमी अंतर्गत प्रत्येक वंचित घटकाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. 2025 हे आदिवासी गौरव वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या अंतर्गत एकलव्य शाळा, पीएम जनमन, वन उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन आणि इको टुरिझमला प्रोत्साहन दिले जाणार आहे. ओबीसी, एसी, एसटी जातीतील नागरिकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सन्मान दिला जाईल.

24. आदिवासी समाजाच्या आरोग्य सेवेसाठी केंद्रित दृष्टीकोन

 आदिवासी मुलांमधील कुपोषण दूर करणे आणि आदिवासी भागात मिशन मोडमध्ये काम करणे हे आमचे ध्येय आहे.

25. भारताची संस्कृती जगासमोर नेली जाईल

तिरुवल्लुवर कल्चर सेंटरच्या माध्यमातून भारताची संस्कृती जगासमोर नेण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील अभिजात भाषांच्या अभ्यासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

26. एमएसएमई, छोटे व्यापारी आणि विश्वकर्मा यांना हमी 

ONDC सह लहान व्यापारी आणि MSME चे सक्षमीकरण करणार. लहान व्यापारी आणि MSME ला ONDC स्वीकारण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणार.

27. भ्रष्टाचाराविरोधात आणखी कठोर कायदे आणणार

सरकार भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम अधिक कठोरपणे राबवली जाईल, असे आश्वासन भाजपने मोदींच्या जाहीरनाम्यात दिले आहे. परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मचा मंत्र शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू केला जाईल.

28. ई-श्रम योजना

भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात कामगार, टॅक्सी ड्रायव्हर्स, ऑटो ड्रायव्हर्स, घरगुती कामगार, स्थलांतरित कामगार, ट्रक ड्रायव्हर आणि पोर्टर्स या सर्वांसाठी ई-श्रम कल्याणकारी योजनांचा सुरू केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

29. तरुणांसाठी स्टार्टअप अन् गुंतवणूक

तरुणांसाठी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, स्टार्टअप, क्रीडा, उच्च मूल्य सेवा आणि पर्यटनाचे नवीन मार्ग खुले होतील.

30. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल

भाजपने आपल्या ठराव पत्रात आयुष्मान भारत योजनेत ५ लाख रुपयांचे उपचार मोफत मिळतील असे आश्वासन दिले आहे. भविष्यातही ही योजना सुरू राहणार आहे. पारदर्शक परीक्षेमुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल. प्रत्येक नागरिकाला चांगले शिक्षण दिले जाईल.