Vastu Tips : मनी प्लाँट चोरणे योग्य की अयोग्य? कधीही करू नका या 5 चुका
- FB
- TW
- Linkdin
घरामध्येच का ठेवावे मनी प्लाँट?
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लाँट घरामध्येच ठेवावे. कारण हे रोप घराबाहेर लावणे अशुभ मानले जाते. तसेच हे रोप कोणालाही भेटवस्तू म्हणून देणे टाळावे.
मनी प्लाँट या दिशेमध्ये ठेवू नका
मनी प्लाँट नेहमी योग्य दिशेमध्ये ठेवणे गरजेचे आहे. कधीही घराच्या उत्तर-पूर्व दिशेमध्ये रोप ठेवू नका, अन्यथा आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो; असे म्हणतात.
कोणत्या दिशेला ठेवावे रोप?
मनी प्लाँट नेहमी दक्षिण-पूर्व या दिशेमध्येच ठेवावे. या दिशेमध्ये रोप लावल्यास घराची भरभराट होते. अन्य दिशेला रोप ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
मनी प्लाँट सुकता कामा नये
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लाँट कधीही सुकता कामा नये. सुकलेले मनी प्लाँट आपल्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून चांगले नसते. मनी प्लाँट सुकल्यास प्रगतीत अडथळे निर्माण होतात आणि गरिबी वाढते.
वेलीचा जमिनीला स्पर्श होता कामा नये
मनी प्लाँटची भराभर वाढ होते. पण मनी प्लाँटच्या वेलीचा जमिनीला कधीही स्पर्श होता कामा नये, हे लक्षात ठेवा. ही वेल दोरीच्या मदतीने वरील बाजूस बांधून ठेवा.
मनी प्लाँट चोरून लागवड करणे योग्य की अयोग्य?
चोरी करून मनी प्लाँट आपल्या घरामध्ये लावणे अतिशय शुभ असते, असा काही लोकांचा समज आहे. पण वास्तुशास्त्रानुसार, चोरून मनी प्लाँट लावणे चांगले नव्हे. ही बाब घरासाठी शुभ नसते.
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा :
दरवर्षी डिसेंबर महिन्यातच COVID-19चा नवा व्हेरिएंट का आढळतो? जाणून घ्या कारणे
Vastu Tips : घरात कढीपत्त्याचे रोप लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या