रक्तशुद्धी करायचीय? मग जाणून घ्या हे नैसर्गिक रामबाण उपाय
बीटमध्ये बीटासायनिन नावाचे अँटीऑक्सिडेंट्स आहे. ज्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत मिळू शकते. बीट ज्युस किंवा बीटाचे सूप तयार करून आपण पिऊ शकता.
रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळू शकते. शक्य असल्यास कोमट पाण्याचा वापर करावा.
आवळा म्हणजे 'व्हिटॅमिन सी'चा उत्तम स्त्रोत. आवळ्यातील पोषण तत्त्वांमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. तसेच अन्य आजारांपासून आरोग्याचे संरक्षण होते.
तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास आरोग्यास कित्येक फायदे मिळतात. रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत मिळू शकते. शिवाय रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढते.
आले व लिंबाचा रस एकत्रित करून पाणी प्यायल्यास रक्त शुद्ध होते. आल्याच्या चटणीमध्ये लिंबाचा रस आणि काळी मिरी मिक्स करून खाऊ शकता.
रिकाम्या पोटी लसूण खाणे फायदेशीर असते, असे म्हणतात. यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येते तसेच रक्तही शुद्ध होण्यास मदत मिळू शकते. फंगल इंफेक्शन होण्याचाही धोका कमी होतो.
रक्तशुद्धीसाठी कडुलिंबाचा पाला देखील लाभदायक आहे. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारचे या पाल्याचे सेवन करावे.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.