सार

कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 17 वर्षीय मुलीने येडियुरप्पा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे.

Karnataka : कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Former CM BS Yediyurappa) यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलीने माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरूतील सदाशिवनगर पोलीस स्थानकात मुलीच्या आईने येडियुरप्पा यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुलीला खोलीत बोलावून छेडछाड
महिलेने आरोप लावत म्हटले की, 2 फेब्रुवारीला मुलीला घेऊन एका फसवणूकीच्या प्रकरणासंदर्भात येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेली होती. यादरम्यान, येडियुरप्पा यांनी मुलीसोबत छेडछाड केली. एफआयआरमध्ये महिलेने म्हटलेय की, येडियुरप्पा यांनी कथित रुपात मुलीला खोलीत बोलावून घेतले आणि तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, मुलीने येडियुरप्पा यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत खोलीतून पळ काढला. यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.

तपासानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल- प्रदेश गृहमंत्री
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या कथित आरोपांप्रकरणात प्रदेश गृहमंत्री परमेश्वरम यांनी म्हटले की, हे प्रकरण माजी मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. महिलेने पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. यामुळे जो पर्यंत सत्य समोर येत नाही तोवर कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. रिपोर्ट समोर आल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल.

आणखी वाचा : 

Mamata Banarjee : डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल, टीएमसी पक्षाने मुख्यमंत्र्यांना गंभीर दुखापत झाल्याची दिली माहिती

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या गटाला सुनावले, शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरण्यास केली मनाई

उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिली ऑफर, नितीन गडकरींनी ठाकरेंना दिले प्रत्युत्तर