ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करण याच्या गाडीने ३ मुलांना उडवले, दोघांचा जागेवर मृत्यू आणि तिसरा दवाखान्यात दाखल

| Published : May 29 2024, 02:26 PM IST

karan singh car

सार

ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करण सिंह याच्या मुलाच्या ताफ्यातील गाडीने तिघांना चिरडले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटना घडून गेल्यानंतर करणं सिंह यांनी घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेले आहेत. 

देशभरात सध्याच्या घडीला हिट अँड रनचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून आले आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि आता उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारची घटना घडल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मायतदारसंघातील उमेदवार करण भूषण सिंह यांच्या गाडीने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे. दोन जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून तिसऱ्या जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

करण भूषण सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांचे चिरंजीव -
करण भूषण सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांचे चिरंजीव आहेत. अपघातानंतर करण भूषण सिंह हे घटनास्थळावरून गायब झाले असून त्यांची पोलीस स्कॉर्ट अशी लिहिलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. करण यांचा ताफा हुजुरपूरच्या दिशेने जात असताना वैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ रोड ओलांडणाऱ्या तीन मुलांना करण भूषण सिंह यांच्या गाडीने चिरडले आहे. 

करण भूषण सिंह यांना ताफा थांबला नाही - 
करण भूषण सिंह यांचा ताफा येथे थांबला नाही. करण भूषण यांनी उतरून मुलांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ताफ्याने मुलांना चिरडल्यामुळे दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तिसऱ्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर घटनास्थळी शेकडो लोक जमा केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी रास्ता रोको करायची कारवाईची मागणी केली आहे. करण भूषण सिंह यांनी केलेल्या अपघातामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. 
आणखी वाचा - 
अरविंद केजरीवाल यांना २ जुनलाच करावे लागणार आत्मसर्पण, सर्वोच्च न्यायालयाने याचिकाच स्वीकारली नाही
Sony Pictures Networks CEO: डिस्ने स्टारचे 'हे' अधिकारी सोनी पिक्चर्स नेटवर्कमध्ये सामील, मिळाली मोठी जबाबदारी