सार
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी तिहार तुरुंगात हजेरी लावावी लागणार आहे. त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने स्वीकारली नसून त्यामुळे त्यांची रवानगी ही तुरुंगात होणार आहे. त्यांना १० मे रोजी अंतरिम जामीन जाहीर झाला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन वाढून द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना २ जून रोजी न्यायालयापुढे आत्मसमर्पण करावे लागणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी मेडिकलचे कारण देऊन ७ जूनपर्यंत अंतरिम जामीन वाढून देण्यात यावा अशी मागणी केली होती पण त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला नकार -
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला नकार देण्यात आला आहे. त्यांची याचिका ७ दिवसांनी पुढे ढकलण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी तिहार तुरुंगात हजर व्हावे लागणार आहे. त्यांनी मागितलेल्या अतिरिक्त जामिनाला नकार दिल्यामुळे त्यांचे वकील काय करतात याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
उपचारासाठी मागितला होता अतिरिक्त अवधी -
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपचारासाठी न्यायालयाकडे अतिरिक्त जामीन मागितला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागणार आहे,. आम आदमी पार्टीच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीईटी-सीटी स्कॅन तसेच इतर अनेक चाचण्या कराव्या लागतील. त्यामुळे त्यांनी तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे ७ दिवसांची मुदत मागितली होती.
अरविंद केजरीवाल यांना १० मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी अंतरिम जामीन मंजूर करत असताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, "लोकसभा निवडणूक ही या देशातील महत्वाची निवडणूक आहे. पुढील ५ वर्षासाठी राहणाऱ्या सरकारला निवडणूक देण्यासाठी ही निवडणूक घेतली जाते. त्यामुळे राजकारण्यांना आता जमीन दिल्यावर सामान्य नागरिकांपेक्षा वेगळा न्याय दिला जातो हा संदेश जाईल असे विरोधी गटाच्या वकिलाने युक्तिवाद केला होता आणि तो युक्तिवाद न्यायालयाने नाकारला होता.
आणखी वाचा -
Pune Porsche Accident : तुला पाहिजे तेवढे पैसे घे, मला मारू नकोस, धनिकपुत्राने प्रत्यक्षदर्शींना पैसे केले होते ऑफर
'भविष्यात सिंगल मदर झाल्यास आनंद होईल', अभिनेत्रीने Eggs फ्रीज करत म्हटले...