काँग्रेस पक्षाने गरिबांसाठी काहीच काम केले नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केली टीका

| Published : May 07 2024, 07:05 PM IST

PM Narendra Modi in Andhra Pradesh

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहिल्यानगर येथे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहिल्यानगर येथे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली आहे. काँग्रेसने फक्त लोकांचे खिसे भरण्याचं काम केलं, असं यावेळी मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी भाजप सरकार लोकांचे काम करत असून त्यांनाच परत लोक निवडून देणार असल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे. 

नरेंद्र मोदी काय म्हणाले? - 
इंडिया आघाडीची एक्स्पायरी डेट आता संपत आली आहे. देशात एनडीएला लोकांचे पाठबळ मिळत आहे. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. एनडीए हे विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा अभिमान यापैकी कोणत्या विषयावर बोलते याचा तुम्हीच आढावा घ्या, असे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. 

काँग्रेसने गरिबी हटवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. पन्नास वर्षात गरिबी कमी झाली नाही पण एनडीए सरकारने गरिबी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचा पुनरुच्चार यावेळी त्यांनी केला आहे. इंडिया आघाडी आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असून ते आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी कोणत्याही ठरला जाऊ शकतात, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. 
आणखी वाचा - 
Water Cut : वरळी, दादारसह मुंबईतील 'या' ठिकाणी पुढील 24 तासात 20 टक्के पाणी कपात
Mumbai Weather : मुंबईतील नागरिकांमध्ये पोटासंबंधित समस्यांमध्ये वाढ, दररोज 30 हून अधिक रुग्णांची रुग्णालयांमध्ये धाव, अशी घ्या आरोग्याची काळजी