120 हुन अधिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपी जलेबी बाबाचा तुरुंगात अंत

| Published : May 09 2024, 06:48 PM IST

Murder Dead Body

सार

जलेबी बाबाचे नाव अमरपुरी आहे. आधी तो जलेबी विकायचा, मग तो बाबा बनून तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करायचा. जलेबी बाबा महिलांना चहामध्ये नशा करून बेशुद्ध करायचा, त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचा.

 

नवी दिल्ली : हरियाणाच्या हिस्सार तुरुंगात बलात्कार प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या जलेबी बाबाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. जलेबी बाबाने 120 हून अधिक महिलांवर बलात्कार केला होता त्याची शिक्षा तो भोगत होता. आधी तो महिलांना चहात नशेचा पदार्थ टाकून बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करत त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचा. हिसार येथील सेंट्रल जेलमध्ये तो कैद होता आज त्याच्या मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण होता जलेबी बाबा ?

जलेबी बाबाचे खरे नाव अमरपुरी आहे. आधी त्याचा जलेबीचा गाडा होता त्यावर जलेबी विकायचा, मग तो बाबा बनून तंत्र-मंत्राच्या नावाखाली प्रसिद्ध झाला आणि नंतर महिलांवर उपचाराच्या नावाखाली बलात्कार करू लागला. जलेबी बाबा महिलांना चहामध्ये नशा करून बेशुद्ध करायचा, त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचा.

2018 मध्ये पहिल्यांदाच चर्चेत :

2018 मध्ये जलेबी बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला. या अश्लील व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.त्यावेळी तपासादरम्यान पोलिसांना आश्रमातून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले होते. याशिवाय सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडिओही पाहायला मिळाले. अनेकांनी त्याला विरोधही केला होता.

जलेबी विकणारा बाबा कसा बनला ?

जलेबी बाबा पंजाबमधील मानसा येथील रहिवासी आहे. रोजगारासाठी तो हरियाणातील टोहाना शहरात आला आणि रस्त्यावर जिलेबी विकू लागला. दिवसेंदिवस लोक त्याला ओळखू लागले. बिल्लू की जलेबी नावाने त्याने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. अचानक त्याची एका बाबांसोबत भेट झाली आणि त्यानंतर तो जिलेबी विक्रेता बाबा बनला. नंतर त्याने आश्रमही बांधले.

आश्रमाच्या आडून महिलांवर होत होते बलात्कार :

आश्रमात अनेक महिला येत असत. जेलबी बाबा त्यांच्या समस्या ऐकत असत. त्यानंतर तो महिलांना ड्रग्ज देऊन बलात्कार करायचा आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायचा . अशा 120 हुन अधिक पीडित महिला आहेत.

आणखी वाचा :

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नवनीत राणा, ओवैसींवर केला हल्लाबोल

Viral Video :भरदिवसा चोरट्याने असे काही केले ते पाहून तुम्हाला बसेल धक्का ; यावर दिल्ली पोलिसांची देखील कारवाई