सार

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हेल्मेट घालून बाईक चालवताना दिसत आहे आणि त्याने बाईकवर सामानही ठेवले आहे. तेवढ्यात चोर येतो आणि दुचाकीस्वाराकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून घेण्यास सुरुवात करतो.असा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

दिल्लीतील सदर बझारमध्ये चोरांचे धाडस इतके वाढले आहे की ते दिवसाढवळ्या लोकांचे पैसे हिसकावून घेत आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक चोर दुचाकीस्वाराच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढत असल्याचे दिसून आले आहे. तेव्हा दिल्ली पोलिसांचा एक हवालदार तिथे धावतो आणि त्याला पकडतो. आजूबाजूचे लोक या गुन्हेगारांना विरोध करत नाहीत कारण त्यांना भीती वाटते की हे लोक चाकू किंवा ब्लेडने हल्ला करतील म्हणून ते शांत राहतात.

या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, दिल्ली पोलिसांच्या शिपायाने चोराला रंगेहाथ पकडले आहे.तसेच पाकीट चोरण्याचा प्रयत्न करत असताना त्याला मागून धावत त्याची कॉलर पकडून त्याला चोरी करण्यापासून थांबवल. त्या नंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चोरट्यावर कारवाई केली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या अधिकृत X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अल्पावधीतच असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओत शहरात अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांचे महत्त्व पटवून दिले आहे. तर काही जण दिल्ली पोलीस शिपाई यांचे कौतुक करीत आहे. सध्या या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.तसेच या व्हिडीओवरील कँमेटन्स देखील अनेकांच्या लक्ष वेधत आहेत. यामध्ये अनेकांनी म्हंटले आहे की, अश्या पोलीस शिपायांची देशाला गरज आहे. तसेच अनेकांनी म्हंटले आहे की, अशी तत्परता प्रत्येकानेच ठेववी.

आणखी वाचा :

RBI चा मोठा निर्णय, या बँकांमधून 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर घातली बंदी

सॅम पित्रोदांचा इंडियन ओव्हरसीज काँग्रेस प्रमुख पदाचा राजीनामा, पक्षाने म्हटले…