शाहरुख खान अभिनेत्याच्या वेशातील देशद्रोही, जगद्गुरू रामभद्राचार्यांचा खळबळजनक आरोप
Jagadguru Rambhadracharya Calls Shah Rukh Khan A Traitor : आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूंना खरेदी केल्यामुळे केकेआरचा मालक शाहरुख खान वादात सापडला आहे. जगद्गुरू रामभद्राचार्यांसह अनेकांनी त्याला देशद्रोही संबोधून संताप व्यक्त केला आहे.

खान त्रिकूट
जेव्हा कोणतीही घटना घडते, तेव्हा स्टार कलाकार त्यावर प्रतिक्रिया देतात. पण पाकिस्तान, बांगलादेशसारखे मुस्लिम देश दहशतवादात गुंतलेले असतानाही, तिथल्या चाहत्यांना वाईट वाटेल या भीतीने बॉलिवूडचे खान त्रिकूट गप्प बसतात, यावर सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाली आहे.
बॉलिवूडचा बादशाह
आता बॉलिवूडच्या बादशाहने एक पाऊल पुढे टाकत हिंदूंची हत्या करणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना खरेदी करून मोठा वाद निर्माण केला आहे. आपल्या देशावर प्रेम करणारा कोणताही भारतीय असे काम करणार नाही, असे म्हणत सोशल मीडियावर शाहरुख खान विरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
केकेआर संघ
बांगलादेशी खेळाडूंना आपल्या संघात खरेदी केल्याबद्दल इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा मालक असलेल्या शाहरुखवर अनेक दिग्गज आणि देशभक्त टीका करत आहेत.
जगद्गुरू रामभद्राचार्य काय म्हणाले?
जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. शाहरुख खानचा इतिहास काय आहे? त्याला काही इतिहास नाही. तो एक देशद्रोही आहे आणि तो हे वारंवार सिद्ध करत आहे. तो सुपरस्टार नाही, असे ते म्हणाले. कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनीही शाहरुख खानवर टीका केली आहे.
अफाट प्रेम
इतकंच नाही, तर विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय, सामाजिक, धार्मिक नेते शाहरुखवर टीका करत आहेत. भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या आणि हिंदूंची हत्या करणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांवर अशा लोकांचे प्रेम नेहमीच असते, यात नवीन काही नाही, असे ते म्हणत आहेत.
देशभक्ती फक्त अभिनयात!
काही अभिनेत्यांनी चित्रपटांमध्ये देशभक्तीच्या नावावर पैसे कमावण्याचा धंदा सुरू केला आहे. जेव्हा ते देशभक्तीचा अभिनय करतात, तेव्हा चाहते त्यांची प्रशंसा करतात आणि त्यांना देव मानतात. पण वेळ आल्यावर अशा अभिनेत्यांचे खरे स्वरूप समोर येते. मात्र, काही लोक सोशल मीडियावर टीका करत आहेत की, 'चाहतेपणात अडकलेल्या भारतीयांना हे समजण्याची मानसिकता नसते'.

