सार
‘आदित्य एल-1’ च्या लाँचिंगवेळी इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान झाले होते. सध्या सोमनाथ कॅन्सर आजारावर औषध घेत आहेत.
Isro chief Somnath diagnosed with cancer : भारताच्या ‘आदित्य एल-1’ मोहिमेच्या लाँचिंगवेळी इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान झाले होते. सोमनाथ यांनी एका मुलाखतीत म्हटले की, "स्कॅनिंगमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले होते. ‘चंद्रयान-3’ (Chandrayaan-3) मोहिमेच्या लाँचिंगदरम्यान, आरोग्यासंबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी नक्की काय झालेय हे स्पष्ट नव्हते. पण आदित्य मोहिमेच्या वेळी मला कॅन्सर झाल्याचे कळले. यामुळे मी आणि घरातील मंडळी त्रस्त झाले होते."
याशिवाय इस्रोमधील सर्व वैज्ञानिकांना सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान झालेय हे माहिती नव्हते. पण आदित्य मोहिमेच्या वेळी सोमनाथ यांनी स्वत:ला सावरत लाँचिंग यशस्वी केले. लाँचिंगनंतर सोमनाथ यांनी पोटाचे स्कॅनिंग केले. त्यावेळी आजाराबद्दल कळले. अधिक तपासणीसाठी सोमनाथ चेन्नईत आला. त्यावेळी कळले की, कॅन्सर आजार त्यांना वंशानुगत झाला आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर झाला होता.
काही दिवसांमध्ये कॅन्सरची पुष्टी झाली. यानंतर सोमनाथ यांनी शस्रक्रिया केली. त्यानंतर केमोथेरपी सुरू राहिली. सोमनाथ यांनी म्हटले की, संपूर्ण घरातील मंडळींना माझ्या आजाराबद्दल कळले असता धक्का बसला होता. पण उपचार घेतल्याने आजार बरा झाला. सध्या औषध सुरू आहेत.
आता प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झालीय- एस. सोमनाथ
सोमनाथ यांनी पुढे म्हटले की, "उपचारासाठी दीर्घकाळ लागेल. खरंतर ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. पण मी आजाराशी लढणार. खुप आरोग्यात सुधारणा झाली आहे. मी केवळ चार दिवस रुग्णालयात होतो. त्यानंतर माझे काम पूर्ण केले. कोणतेही दुखणे नसताना मी पाचव्या दिवशी कामावर रुजू झालो. सध्या सातत्याने वैद्यकीय चाचण्या आणि स्कॅनिंग करत असल्याचे सोमनाथ यांनी म्हटले आहे. आता पूर्णपणे मी बरा झालो आहे. माझे काम आणि इस्रोच्या मिशनसह लाँचिंगकडे पूर्णपणे लक्ष आहे."
आणखी वाचा :