पुरुषसत्ताक विचारसरणीला विरोध करणाऱ्या एका इन्फ्लुएन्सरने सी-सेक्शनबद्दल पुरुषांमध्ये जागरूकता निर्माण करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. महिलांकडून या व्हिडिओला मोठा पाठिंबा मिळत आहे.

आपण दररोज भारतात महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांच्या भयानक बातम्या वाचतो. अनेकदा पुरुषी मानसिकतेच्या बातम्या तर हेडलाईन्सपर्यंत पोहोचतही नाहीत. भारतात स्त्री म्हणून जगणं खरंच खूप कठीण आहे. पण सुदैवाने, आजकाल अनेक पुरुष आणि महिला इन्फ्लुएन्सर पुढे येत आहेत. ते पुरुषसत्ताक व्यवस्थेचे बळी ठरलेल्या महिलांसाठी आवाज उठवत आहेत आणि पुरुषांनाही शिक्षित करत आहेत.

इन्फ्लुएन्सरने पुरुषांना दिले सी-सेक्शनचे धडे

असाच एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पुरुषसत्ताक विचार मोडून काढण्यावर विश्वास ठेवणाऱ्या एका इन्फ्लुएन्सरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सी-सेक्शन डिलिव्हरीची वास्तविकता आणि त्यातील वेदना त्याने या व्हिडिओत मांडल्या आहेत. आजही काही पुरुष या विषयावर किती असंवेदनशील असतात, यावर त्याने भाष्य केलंय. स्वतःच्या बायकोच्या डिलिव्हरीचा अनुभव सांगत त्याने पुरुषांना सी-सेक्शनबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "माझ्या बायकोला ज्या वेदनांमधून जावं लागलं, ते मी कधीच पूर्णपणे समजू शकणार नाही. तिने २३ तास लेबर पेन सहन केलं आणि त्यानंतर इमर्जन्सी सी-सेक्शन करावं लागलं. शरीराचे थर कापणे, टाके, वेदना, अशक्तपणा आणि सर्जरीनंतरचं तिचं पहिलं पाऊल... प्रत्येक पावलावर तिला होणाऱ्या वेदना सांगत होत्या की तिच्या शरीरावर नुकतीच एक मोठी सर्जरी झालीय. भूल दिल्याने तिला भास होत होते. पण या सगळ्या वेदनांमध्येही तिची सर्वात मोठी काळजी आमचं बाळ होतं. मी फक्त तिच्या बाजूला उभा राहून तिचा हात धरू शकत होतो, पण तिच्या वेदना कमी करू शकत नव्हतो. त्या दिवशी मी फक्त माझ्या बायकोला आई होताना पाहिलं नाही, तर तिची अशी ताकद पाहिली जी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती."

View post on Instagram
 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, "हा व्हिडिओ पाहताना मला रडू आलं... प्रत्येक शब्द मनाला भिडला." दुसऱ्याने लिहिलं, "माझी वंशवेल माझ्यासोबतच संपेल, याबद्दल मला वाईट वाटतंय." आणखी एकाने कमेंट केली, "भावा, तुझ्या बायकोने तिचं आयुष्य जिंकलं." तर एका युजरने आपला अनुभव सांगताना लिहिलं, "डॉक्टरांनी हे नवऱ्यांसमोरच करायला हवं. ऑस्ट्रेलियामध्ये माझ्यासमोरच त्यांनी हे केलं होतं."