- Home
- India
- Palitana Vegetarian Village : देशातील एकमेव गाव जिथे मांस, अंडी आणि दारूवर आहे पूर्ण बंदी
Palitana Vegetarian Village : देशातील एकमेव गाव जिथे मांस, अंडी आणि दारूवर आहे पूर्ण बंदी
आपल्या देशात एक असं गाव आहे, जे १००% शाकाहारी आहे. इथे मांस आणि अंडी तर दूरच, पण लोक कांदा-लसूणही खात नाहीत. या अनोख्या आणि खास गावाचं नाव आहे पालिताना.

पूर्ण शाकाहारी गाव
भारतात अनेक तीर्थक्षेत्रं आणि अनोखी गावं आहेत. असंच एक गाव गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात आहे. या गावाचं नाव पालिताना असून ते शेत्रुंजय डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे. जैन धर्मीयांसाठी हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या डोंगरावर ९०० पेक्षा जास्त संगमरवरी मंदिरे आहेत, ज्यांची शिल्पकला अप्रतिम आहे. हे ठिकाण अध्यात्म आणि अहिंसेचं प्रतीक बनलं आहे. जगात पहिल्यांदाच याच शहरात मांसाहार आणि प्राणी हत्येवर कायदेशीररीत्या पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

कधी घातली बंदी?
या पवित्र ठिकाणाचं पावित्र्य जपण्यासाठी २०१४ मध्ये शेकडो जैन मुनी आणि स्थानिक लोकांनी मोठं उपोषण केलं होतं. इथले कत्तलखाने बंद करावेत आणि प्राण्यांची हत्या पूर्णपणे थांबवावी, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. या मागणीची दखल घेत सरकारने पालिताना नगरपालिका हद्दीत प्राण्यांची हत्या आणि मांस विक्रीवर पूर्ण बंदी घातली. इथे फक्त मांसच नाही, तर अंडी विकायलाही सक्त मनाई आहे. या नियमाचं उल्लंघन करून कोणी मांसाहार विकल्यास त्याला कडक शिक्षा आणि दंड ठोठावला जातो.
दारूबंदी आणि सात्विक आहार
गुजरात राज्यात आधीपासूनच दारूबंदी लागू आहे. त्यातच सरकारच्या या नव्या निर्णयामुळे पालिताना हे दारू आणि मांस अजिबात न मिळणारं एकमेव ठिकाण बनलं आहे. इथल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रस्त्यावरील गाड्यांवर फक्त शुद्ध शाकाहारी जेवणच मिळतं. कांदा आणि लसूण न वापरता बनवलेल्या सात्विक आहाराला इथे जास्त महत्त्व दिलं जातं. अहिंसेचा केवळ विचार न करता तो प्रत्यक्षात अमलात आणणारं पालिताना गाव, आज जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम आदर्श बनलं आहे.






