भारत सरकारने 'SACHET' नावाची आपली स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट आपत्कालीन इशारा प्रणाली (emergency warning system) अधिकृतपणे सुरू केली आहे. याची चाचणी म्हणून देशभरातील मोबाईल ग्राहकांना एक टेस्ट मेसेज पाठवण्यात आला. C-DOT ने विकसित केलेली ही प्रणाली नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तात्काळ सूचना देण्यासाठी बनवली आहे.

आज अचानक तुमच्या फोनवर मोठा आवाज होऊन सरकारकडून एक अलर्ट आला असेल, तर घाबरू नका. तुम्ही एकटे नाही आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही. शनिवारी, भारत सरकारने आपल्या स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट आपत्कालीन इशारा प्रणालीची चाचणी केली. यासाठी देशभरातील लाखो मोबाईल युजर्सना एक टेस्ट मेसेज पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये 'अत्यंत गंभीर सूचना' (Extremely Severe Alert) असं लिहिलं होतं. भारताने ही नवीन आपत्कालीन सूचना सेवा सुरू केली असून, नागरिकांनी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही, असं त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं.

काय आहे ही नवीन सिस्टीम?

सरकारी घोषणेनुसार, ही सिस्टीम २ मे २०२६ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लाँच केली. या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी 'SACHET' (Integrated Alert System) नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. ही सिस्टीम दूरसंचार विभागाच्या (Department of Telecommunications) प्रमुख संशोधन आणि विकास केंद्राने, म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT) ने तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (International Telecommunication Union) कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉलवर (Common Alerting Protocol) ही प्रणाली आधारित आहे. सध्या ही सिस्टीम भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.

आतापर्यंत, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी या प्रणालीचा वापर करून नैसर्गिक आपत्ती, हवामानाचा इशारा आणि चक्रीवादळांच्या वेळी १९ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये १३४ अब्ज पेक्षा जास्त SMS अलर्ट पाठवले आहेत.

नेटिझन्स काय म्हणाले?

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की हे मेसेज एका सरावाचा भाग होते. नागरिकांच्या मोबाईल सेटिंगमध्ये टेस्ट चॅनल सुरू असल्यास त्यांना इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये हे टेस्ट मेसेज आले असतील.