IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ‘हस्तांदोलन वाद’ पुन्हा पेटला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्यानंतर गौतम गंभीरने ड्रेसिंगरूममधून खेळाडूंना बोलावून अंपायर व मॅच रिफरींसोबत हस्तांदोलन करण्यास सांगितले.
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सुपर-4 सामन्यानंतर पुन्हा एकदा ‘हस्तांदोलन वाद’ तापला आहे. यावेळी केंद्रस्थानी भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर होते. भारताने विजय मिळवल्यानंतर गंभीरने सीमारेषेजवळ उभं राहून खेळाडूंना ड्रेसिंग रूममधून बोलावलं आणि अंपायर्स व मॅच रिफरींसोबत हस्तांदोलन करण्यास सांगितलं.
यापूर्वी नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन टाळले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात काही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. तिलक वर्मा व हार्दिक पांड्या थेट ड्रेसिंगरूमकडे गेले होते. मात्र, गंभीरच्या सूचनेनंतर खेळाडूंनी अंपायर व मॅच रिफरी अँडी पायकॉफ्ट यांच्यासोबत हस्तांदोलन केले.
खेळाच्या घडामोडीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 172 धावा केल्या. भारतासाठी अभिषेक शर्मा (39 चेंडूत 74) आणि शुभमन गिल (28 चेंडूत 47) यांनी दमदार सुरुवात करून दिली. अखेरीस तिलक वर्मा (नाबाद 30) च्या खेळीमुळे भारताने 6 गडी राखून सहज विजय मिळवला आणि सुपर-4 मधील आपली स्थिती मजबूत केली.


