PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आज त्यांचा वाढदिवस देशभरात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या वयातही सतत व्यस्त असणाऱ्या मोदींच्या फिटनेसचं रहस्य काय?
PM Modi Birthday - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) १७ सप्टेंबर रोजी आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजच्या काळात वयाची ५० ओलांडताच दम लागतो. ७५ व्या वर्षी बीपी, शुगर, आजारपण यामुळे हॉस्पिटलच्या फेऱ्या मारणारे आणि अंथरुणाला खिळलेलेच जास्त दिसतात. पण पंतप्रधान मोदींसाठी वय हा केवळ एक आकडा आहे. ते दिवसभर सक्रिय असतात. राजकारणापासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी सक्रिय असलेले मोदी १८ तास सतत काम करतात. मोदींच्या या उत्साही आणि सक्रिय जीवनाचे रहस्य त्यांची फिटनेस आणि दिनचर्या आहे. कडक डाएट, योग, उपवास आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे त्यांच्या ऊर्जेचे रहस्य आहे.

पंतप्रधान मोदींचा डाएट प्लॅन (Modi Diet Plan): सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत मोदी काय खातात.
नाश्ता: साधा पण पौष्टिक नाश्ता, मोदी सकाळी ९ च्या आत पूर्ण करतात. त्यांच्या नाश्त्यामध्ये हंगामी फळे, हिरव्या भाज्या आणि धान्ये असतात. कधीकधी ते हलके पोहे आणि आल्याचा चहा घेतात. यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
शेवग्याचा पराठा: मोदींच्या ऊर्जेचे रहस्य म्हणजे शेवग्याचा पराठा. हे त्यांनी स्वतः पूर्वी मान्य केले आहे. यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात, तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासून ते दूर राहतात.
गुजराती खिचडी: मोदी अनेकदा रात्रीच्या जेवणात गुजराती खिचडी खातात. ही हलकी आणि पचायला सोपी असते. मोदी मसालेदार पदार्थांपासून दूर राहतात. बहुतेक दिवशी मोदी संध्याकाळी ७ वाजता आपले रात्रीचे जेवण पूर्ण करतात.
पंतप्रधान मोदींचा फिटनेस: आहारासोबतच मोदी शारीरिक व्यायामालाही अधिक महत्त्व देतात.
योग आणि ध्यान: पंतप्रधान मोदींचा फिटनेस मंत्र योग आहे. योगामुळे सर्व काही शक्य आहे, असा त्यांचा विश्वास आहे. सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान आणि योग निद्रा यासह ते दररोज पंचत्व योग करतात. योग त्यांच्यासाठी केवळ व्यायाम नाही, तर जीवनशैली आहे. हे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक संतुलनाचे रहस्य आहे.
झोप: नरेंद्र मोदी फक्त ३ ते ४ तास झोपतात. उरलेला वेळ ते कामात व्यस्त असतात. झोपेची कमतरता टाळण्यासाठी ते योग निद्रेची मदत घेतात. यामुळे त्यांच्या शरीराला खोलवर विश्रांती मिळते आणि दिवसभर ते उत्साही राहतात.
चालणे (Walking): योग, झोपेसोबतच मोदींचे निसर्गाशीही विशेष नाते आहे. ते गवतावर अनवाणी चालतात. यामुळे तणाव कमी होतो, वेदना आणि सूज कमी होते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
मोदींची उपवासाची दिनचर्या: मोदी गेल्या ५० वर्षांपासून उपवासाचे नियम पाळत आहेत. ते उपवास कधीही चुकवत नाहीत.
• जून ते नोव्हेंबरपर्यंत ते दिवसातून एकदाच जेवण करतात.
• नवरात्रीच्या काळात ते फक्त गरम पाणी पितात आणि फक्त फळे खातात.
• चैत्र नवरात्रीत ते फक्त एक फळ खातात. नऊ दिवस ते अशाच प्रकारे उपवास करतात.

मोदींच्या आरोग्यदायी सवयी:
• मोदी दिवसभर गरम पाणी पितात. यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीर डिटॉक्स होते आणि चयापचय क्रिया सक्रिय राहते. पण ते खूप गरम पाणी पीत नाहीत.
• वर्षातून सुमारे ३०० दिवस ते मखाणा खातात, असे त्यांनी सांगितले आहे. मखाणा हा कमी कॅलरी आणि उच्च प्रथिने असलेला नाश्ता आहे.
• मोदींच्या आहारात दही असते. यामुळे पचनक्रिया सुधारते.
• ते कमी मसाले आणि कमी तेल असलेले पदार्थ खातात.


