सार
भारतात आता आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यावेळी प्रेकक्षकांमध्ये कोणता संघ जिंकेल यावरून वाद प्रतिवाद होताना दिसत आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू या आयपीएलमध्ये खेळत असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
भारतात आता आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यावेळी प्रेकक्षकांमध्ये कोणता संघ जिंकेल यावरून वाद प्रतिवाद होताना दिसत आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू या आयपीएलमध्ये खेळत असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यावेळी होणाऱ्या आयपीएल विश्वचषकासाठी आयपीएल स्पर्धेकडे एक सराव म्हणून पहिले जात आहे. त्यामुळे खेळाडू चांगला खेळ करण्यावर भर देत आहेत.
टी 20 विश्वचषकाच्या अंतिम संघ निवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली जाईल असे सांगण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धेचा पूर्वार्ध संपल्यानंतर खेळाडूंचा फॉर्म आणि त्यांचा फिटनेस पाहून विश्वचषकासाठी संघाची अंतिम निवड केली जाणार आहे. बीसीसीआयच्या अंतिम निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर असून त्यांच्या अध्यक्षतेखाली संघाची निवड केली जाणार आहे.
खेळाडूंचं फिटनेस आणि त्यांचा फॉर्म पाळहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे निवड समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. गोलंदाजांना त्यांच्या फिटनेसच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागणार आहे. गोलंदाजांना टी 20 च्या सामन्यांमध्ये चार षटके टाकावे लागणार असून त्यांना फिटनेस राखावा लागेल अन्यथा दुसऱ्या गोलंदाजाला संघात सामील करावे लागू शकते.
आणखी वाचा -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मिळाले तिकीट
वर्ष 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने अत्याधिक रोख रक्कम वापरली - सूत्रांची माहिती