भारताचे यश पचवता येत नाही, इंग्लंडमध्ये भारतीय युवकाने केला द्वेष मोहिमेचा आरोप

| Published : Mar 27 2024, 01:34 PM IST

Satyam Surana

सार

मागील वर्षी चर्चेत आलेला सत्यम सुराणा हा विद्यार्थी परत एकदा माध्यमांमध्ये झळकला आहे. आता त्याच्याविरुद्ध द्वेष आणि अपमानजनक मोहीम घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मागील वर्षी चर्चेत आलेला सत्यम सुराणा हा विद्यार्थी परत एकदा माध्यमांमध्ये झळकला आहे. आता त्याच्याविरुद्ध द्वेष आणि अपमानजनक मोहीम घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तो लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असून विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांच्या बारा तासांपूर्वी त्याच्याविरूद्ध एक मोहीम उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

त्याने येथे निवडणुकीसाठी अर्ज भरला होता पण प्रचाराच्या दरम्यान त्याची पोस्टर्स फाडण्यात आली. त्याशिवाय त्याच्या पोस्टरवर विद्रुप करण्याचे काम कोणीतरी येथे केले होते. त्याने भाजप सरकारची स्तुती केलेली असल्यामुळे हे सगळे घडल्याचा आरोप त्याने यावेळी केला. यावेळी येथील एका गटाने ठरवून त्याच्या विरोधात हे काम केल्याचे म्हटले आहे. 

आम्ही कॅम्पसमध्ये फिरून आमचा प्रचार करत होतो पण यावेळी आम्हाला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला जात होता. सत्यमने यावेळी मी माझ्या देशाचे समर्थन करत राहील असे म्हणून निवडणुकीत कोणते मुद्दे मांडणार आहे याबद्दलची माहिती दिली. यावेळी सत्यमला खोटे ठरवण्यासाठी हरएक प्रकारे प्रयत्न केले गेल्याचा त्याने म्हटले आहे. सत्यमने त्याच्या भावना एक्स प्लॅटफॉर्मवरून मांडल्या आहेत. 
आणखी वाचा - 
माझे पती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 28 मार्चला पुराव्यासह सत्य उघड करतील, सुनीता केजरीवाल यांनी केला दावा
'तारक मेहता का उल्टा चष्माचे' निर्माता असित मोदी लैंगिक छळ प्रकरणात दोषी आढळले, कोर्टाने दिला 'हा' आदेश