Ahmedabad Plane Crash : लंडनमध्ये राहणाऱ्या हिरन अधेडा नावाच्या मुलीचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीने तिच्या आई-वडिलांना अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात गमावले आहे. या पत्रातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमान अपघातात आई-वडिलांना एकत्र गमावणाऱ्या हिरल अधेडा या लंडनस्थित मुलीने लिहिलेलं एक भावनिक पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. “12 जून रोजी संध्याकाळी भेटण्याचं तुम्ही दिलेलं वचन पूर्ण होऊ शकलं नाही”, अशा शब्दांत तिने आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत.
एकाच अपघातात दोन्ही पालक गमावले
बडोदा येथील रहिवासी असलेल्या वीणाबेन आणि वल्लभभाई अधेडा यांचा मृत्यू १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत झाला. त्यांची मुलगी हिरल अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहते आणि ती आपल्या आई-वडिलांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र नियतीच्या क्रूर फटक्यामुळे ती वाट पाहणं अधुरंच राहिलं.
एकटं कोण राहील याची होती सतत चिंता
वल्लभभाई अधेडा हे गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्डातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी वीणाबेनसह ते लंडनला जाण्यासाठी निघाले होते. हिरल यांना एक काळजी नेहमी सतावत होती – आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्याचं काय होईल? पण नियतीने त्यांची ती चिंता कायमची मिटवली. दोघांचंही जीवन एकाच वेळी संपलं.
अद्याप एक पार्थिव सापडलेलं नाही
वल्लभभाईंची ओळख डीएनए तपासणीद्वारे पटली आहे, मात्र वीणाबेन यांचं पार्थिव अद्याप सापडलेलं नाही. दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतरच तिन्ही बहिणींनी अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
आई-वडिलांबद्दलचं प्रेम अश्रूंमधून प्रकट झालं
हिरलने लिहिलेल्या पत्रात ती म्हणते, “तुम्ही दोघं किती सुंदर, सेल्फ मेड जीवन जगलात. मला तुमचा नेहमी अभिमान राहील. तुम्ही नेहमी म्हणायचात, ‘आम्ही सर्व काही स्वतः करतो,’ आणि तुम्ही ते खरंच सिद्ध केलं.” “माझी एकच इच्छा आहे – तुम्ही दोघंही मला प्रत्येक जन्मात माझे आई-वडील म्हणून भेटावं. 12 जूनच्या संध्याकाळी आपण भेटू, असं वचन तुम्ही दिलं होतं, पण ती संध्याकाळच आली नाही”, अशा ओघवत्या शब्दांत हिरलने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पायलट सुमित सभरवालच्या अंत्यसंस्कारावेळी वडील ढसाढसा रडले
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात वैमानिक सुमित सभरवालवर 17 जूनला अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 90 वर्षांचे सुमितचे वडील त्याच्या पार्थिवाकडे बघून ढसाढसा रडले. सुमितचे पार्थिव पवईमधील जल वायु विहार येथील घरी आणण्यात आले होते. सुमितला अखेरचे गुडबाय करताना त्याच्या मित्रपरिवाराच्या डोळ्यांतही अश्रू दाटून आले होते.
पनवेलमधील मैथिली मोरेश्वर पाटील ही गावाची प्रेरणा
फ्लाइट अटेंडंट मैथिली फक्त 24 वर्षांची होती. ती पनवेलमधील नहवा गावची रहिवासी होती. विमान अपघाताची बातमी मिळताच गावकरी तिच्या घरी जमले. मैथिलीने विमान क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी खूप कष्ट केले. टीएस रहमान विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मैथिलीने विमान अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. कुटुंब आर्थिक संकटात असले तरी मैथिलीला पूर्ण पाठिंबा मिळाला. एअर इंडियामध्ये नोकरी मिळाल्यानंतर मैथिली केवळ नहवा गावासाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्थान बनली. एका शेजाऱ्याने सांगितले की आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या यशाने आम्हाला खूप आनंद झाला.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


