हरियाणामध्ये BJP-JJP पक्षाची युती मोडली, मनोहर लाल खट्टर यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

| Published : Mar 12 2024, 01:27 PM IST / Updated: Mar 12 2024, 01:30 PM IST

Manohar Lal Khattar

सार

हरियाणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. खट्टर यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे.

Haryana Politics Updates : हरियाणातील राजकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. खट्टर यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपविला आहे. असे म्हटले जातेय की, खट्टर यांना करनाल येथून लोकसभेच्या जागेवरून लढवण्यासाठी संधी दिली जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला, खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने नायब सैनी आणि संजय भाटिया यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत.

हरियाणातील भाजप सरकारने जननायक पक्षासोबत आपली युती मोडली आहे. अशातच भाजपकडून (BJP) जननायक पक्षाला (JJP) मंत्रिमंडळातून पूर्णपणे बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळाच्या घोषणेसाठी अर्जुन मुंडा आणि तरुण चुग पर्यवेक्षक असणार आहेत. बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणीही केली जाऊ शकते.

हरियाणातील विधानासभा जागा
हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. येथे वर्ष 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या. पण भाजपला बहुमत मिळाले नव्हते आणि जेजेपीसोबत मिळून पावणे पाच वर्षांपर्यंत सरकार चालवले. जेजेपीकडे 10 आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसने विधानसभेच्या 31 विधानसभा निवडणुकीतील जागा जिंकल्या होत्या. पण नंतर कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता आणि भाजपात एण्ट्री केली होती. कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई याला पोटनिवडणुकीत विजय मिळाला होता. अशातच भाजपकडे 41 आमदार झाले होते. आता भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू पाहत आहे. त्यांना अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याची गरज असून बहुमताचा आकडा 46 आहे.

आणखी वाचा : 

Loksabha Election 2024: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ देणार राजीनामे, कारणे जाणून घ्या

केंद्र सरकारने देशात CAA लागू केल्यानंतर ममता बॅनर्जी ते असदुद्दीन औवेसी यांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - DRDO चे मिशन दिव्यास्त्र यशस्वी, या मिशनमध्ये काय खास आहे?