सार

Hardik Pandya Son Birthday : भारतीय संघातील ऑलराउंडर हार्दिक पांड्याचा लेक अगस्त्य चार वर्षांचा झाला आहे. याच संदर्भात हार्दिकने एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hardik Pandya Son Agastya Birthday :  भारतीय संघातील खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अशातच हार्दिक पांड्याने त्याचा इंस्टाग्रामवर एक सुंदर असा व्हिडीओ शेअर करत मुलगा अगस्त्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अगस्त्य चार वर्षांचा झाला असून 30 जुलैला त्याचा वाढदिवस असतो. याबद्दलचीच हार्दिकने भावूक पोस्ट व्हिडीओखाली लिहिली आहे. यावर आता अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. याशिवाय हार्दिकच्या चाहत्यांनी अगस्त्यला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

हार्दिक पांड्याची मुलासाठी खास पोस्ट
हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक मुलाला आपण जसे हावभाव करतोय तसे करायला सांगत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय दोघांच्या एकमेकांसोबतच्या आठवणींनाही उजाळा व्हिडीओतून देण्यात आला आहे. यामध्ये अगस्त्यचे अत्यंत निरागस रुप दिसून येत असून हार्दिक पांड्या त्याला खुश करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

व्हिडीओखाली हार्दिक पांड्याने भावूक पोस्ट लिहित म्हटले की, “You keep me going every single day! Happy birthday to my partner in crime, my whole heart, my Agu Love you beyond words”

View post on Instagram
 

हार्दिक पांड्याचे मुलावरील प्रेम
हार्दिक पांड्या आपल्या मुलावर किती प्रेम करतो हे वेळोवेळी त्याने शेअर केलेल्या पोस्ट असो अथवा फोटोंमधून दिसून आले आहे. पण आताही इंस्टाग्रामवरील अगस्त्यच्या वाढदिवसानिमित्तच्या पोस्टमधून मुलगा आणि बाबांमधील प्रेम दिसून येत आहे. खरंतर, नताशा स्टेनकोविकसोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक अगस्त्यपासून दूर झाला असला तरीही मुलावरचे त्याचे प्रेम कायम टिकून आहे.

हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेत असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. यानंतर नताशा मुंबई सोडून सर्बियाला गेली आहे. मुंबई विमानतळावर नताशाला मुलासोबत स्पॉट करण्यात आले होते. आता पुन्हा नताशा भारतात येणार की नाही याची ठोस माहिती नाही. सध्या नताशा मुलगा अगस्त्यसोबत फिरण्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकत्याच एका दोघांच्या फोटोखाली हार्दिकने कमेंट्ही केली होती.

आणखी वाचा : 

नताशा आणि हार्दिक पांड्या एकमेकांपासून विभक्त, मुलाबद्दलही घेतला निर्णय

हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्याच्या चर्चांदरम्यान नताशाने शेअर केला पहिला फोटो, अशी घेतेय स्वत:ची काळजी