सार

ICICI Bank iMobile glitch: खाजगी क्षेत्रातील ICICI बँक वापरकर्त्यांना iMobile-Pay ॲपमध्ये तांत्रिक त्रुटी आढळण्याने समस्यांचा सामना करावा लागला आहे.यामध्ये १७ हजार क्रेडिट कार्ड धारकांची माहिती लीक झाली असून बँकेने यावर त्वरित काम सुरु केले आहे.

ICICI Bank iMobile glitch: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक वापरकर्त्यांना iMobile-Pay ॲपमध्ये तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. खरं तर, अलीकडे काही वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ॲपमधील त्रुटींबद्दल पोस्ट शेअर करत तक्रार दाखल केल्या आहेत. काही वापरकऱ्यांचे म्हणणे आहे की, ते ॲपवर त्यांचे क्रेडिट कार्ड तपशील पाहू शकत नाहीत. काही वापरकर्त्यांच्या मते, ते इतरांच्या क्रेडिट कार्डची माहिती ते पाहू शकतात.

फसवणुकीची शक्यता :

technoFino चे संस्थापक सुमंता मंडल यांनी बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांना या समस्येचे तातडीने निराकरण करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर करत टॅग केले आहे. अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या iMobile-Pay ॲपवर इतर ग्राहकांची ICICI बँकेची क्रेडिट कार्डे पाहू शकत असल्याची नोंद केली आहे. ते म्हणाले की ॲपवर क्रेडिट कार्ड नंबर, कार्डची एक्सपायरी डेट आणि सीव्हीव्ही नंबर देखील दिसत आहे. अशा परिस्थितीत फसवणूक होण्याची शक्यता वाढू शकते. फसवणुकीसाठी अनेकांच्या क्रेडिट कार्डचा वापर केला जाऊ शकतो. सुमंता मंडल यांनी यावर एक उपाय सांगितलं आहे की, स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचे कार्ड ब्लॉक करणे किंवा बदलणे हाच आहे.

आयसीआयसीआय बँकेचे यावर काय म्हणणे?

ICICI बँकेने सांगितले आमचे ग्राहक हे मच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहेत.आम्ही त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत.आमच्या लक्षात आले की गेल्या काही दिवसांत जारी केलेली अंदाजे 17,000 नवीन क्रेडिट कार्ड आमच्या डिजिटल चॅनेलमधील चुकीच्या वापरकर्त्यांसाठी चुकीने मॅप केली गेली आहेत. बँकेच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओमध्ये त्यांचा वाटा सुमारे 0.1% आहे.आम्ही ही कार्डे ब्लॉक केली आहेत आणि ग्राहकांना नवीन कार्ड जारी करत आहोत. या गैरसोयीबद्दल बँकेने वापरकर्त्यांची क्षमा मागितली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत 17,000 कार्ड्सच्या सेटमधून कोणत्याही कार्डचा गैरवापर झाल्याची आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, आम्ही आश्वासन देतो की, कोणतेही आर्थिक नुकसान झाल्यास बँक ग्राहकाला योग्य ती भरपाई देईल.