सार

इस्रोच्या गगनयान मोहीमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अंतराळवीरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय पंतप्रधानांनी कार्यक्रमाला संबोधित करत अंतराळवीरांचे कौतुक केले आहे. 

Gaganyaan Mission : इस्रोची (ISRO) आगामी मोहीम गगनयानच्या माध्यमातून पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला अंतराळात पाठवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वर्ष 2018 मध्ये गगनयान मोहीमेची घोषणा केली होती. अशातच मंगळवारी (27 फेब्रुवारी) अंतराळवीरांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये कॅप्टन प्रशांत बालाकृष्णण नायर, ग्रुप कॅप्टन अजीत कृष्णण, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांच्या नावांचा समावेश आहे. 

सर्व अंतराळवीरांना बंगळुरु येथील एस्ट्रोनॉट ट्रेनिंग केंद्रात ट्रेनिंग देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवनंतपुरममधील इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात चारही अंतराळवीरांची ओखळ जगाला करून दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात गगनयान मोहीम आणि अंतराळवीरांसंदर्भातील एका कार्यक्रमात भाषण दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या. यानंतर पंतप्रधानांनी प्रत्येक राष्ट्राच्या विकास प्रवासात असे काही क्षण येतात जे वर्तमानासह येणाऱ्या पिढ्यांबद्दलही खूप काही सांगून जातात. आज भारतासाठीही असाच काहीसा दिवस आहे. आपली आजची पिढी फार भाग्यवान असून त्यांना पाणी, जमीन, आकाश आणि अंतराळात ऐतिहासिक कामांमध्ये यश मिळत आहे.
  • खरंतर, ही नव्या कालचक्राची सुरुवात असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटले. याशिवाय गेल्या वर्षात भारत पहिला अशा देश बनला ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिंरगा फडकवा. आज शिव शक्ती पॉइंट संपूर्ण जगाला माहितेय. आज विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहोत. काही वेळापूर्वीच गगनयान मोहीमेतील अंतराळवीरांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.
  • "40 वर्षानंतर एखादा भारतीय अंतराळात पाऊल ठेवणार आहे. यंदाची वेळ, काउंटडउन आणि रॉकेटही आपलेच आहे. मला खूप आनंद होत आहे की, अंतराळवीरांना भेटता आले. त्यांच्याशी संवाद साधता आला आणि त्यांची देशासमोर ओखळ करुन देण्याचे भाग्य मिळाले. या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो" असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
  • अंतराळवीरांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, तुम्ही गेल्या काही वर्षांपासून दिवस-रात्र खूप मेहनत करत आहात. देशातील जनता आणि मीडियाला प्रार्थना करतो की, या चारही जणांनी गेल्या काही वर्षांमध्ये फार मेहनत केली आहे. अजूनही खूप काही करणे बाकी आहे. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. चारही जण सेलिब्रेटी झालेत. आता खरी कथा सुरू झाली असून तुमच्या पाठिंब्याची त्यांना गरज आहे.
  • चंद्रयान असो किंवा गगनयान, महिला वैज्ञानिकांशिवाय अशा मोहीमा होणे शक्य नाही. आज 500 हून अधिक महिला इस्रोच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. या सर्वांचे मी कौतुक करतो. पण पुरुष मंडळींनी यामुळे नाराज होऊ नये. त्यांचे देखील मी अभिनंदन करतो असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.
  • पंतप्रधानांनी भाषणात म्हटले, येणाऱ्या 10 वर्षांमध्ये भारतातील स्पेस इकोनॉमी पाच पटींनी वाढून 44 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार आहे. अंतराळ क्षेत्रात भारतात एक सर्वाधिक मोठे ‘ग्लोबल कमर्शिअल हब’ होणार आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण चंद्रावर पुन्हा झेप घेणार आहोत. या यशानंतर आपण आपले लक्ष्य अधिक मोठे करणार आहोत. यानंतर शुक्रावर जाण्याचेही इस्रोचे लक्ष्य आहे. वर्ष 2035 पर्यंत अंतराळात भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असेल.

आणखी वाचा : 

गगनयान मोहीमेसाठी भारताने निवडले चार अंतराळवीर, पंतप्रधानांकडून नावाची घोषणा केली जाणार

Artificial intelligence : AIIMS ने कॅन्सर रूग्णांच्या उपचारासाठी AI वर आधारित UPPCHAR ॲप केले लाँच, त्याची खासियत घ्या जाणून

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 41,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे केले उद्घाटन