White Paper : 'UPAने 10 वर्षात अर्थव्यवस्थेची केली दुरवस्था', मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर

| Published : Feb 08 2024, 07:17 PM IST / Updated: Feb 08 2024, 07:31 PM IST

Stop blaming UPA, Manmohan Singh to gaoverment

सार

White Paper : केंद्र सरकारने मनमोहन सिंग सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, वर्ष 2014मध्ये सरकार पडल्यानंतर यूपीए सरकारच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेतील गैरव्यवस्थापन आणि व्यवस्थापनामध्ये दूरदर्शीपणा नसल्याने कमकुवत अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला.

White Paper :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) लोकसभेमध्ये श्वेतपत्रिका सादर केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरील श्वेतपत्रिकेमध्ये मोदी सरकारने वर्ष 2014 पूर्वी व त्यानंतर भारत देश आणि देशाच्या अर्थव्यवस्था यांच्यातील फरक तपशीलवार मांडला आहे. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची तुलना करणाऱ्या श्वेतपत्रिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे की, “UPA सरकारला एक उत्तम अर्थव्यवस्था वारशामध्ये मिळाली होती. पण 10 वर्षामध्ये त्यांनी या अर्थव्यवस्थेची दुरवस्था केली”.

केंद्र सरकारने मनमोहन सिंग सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, "वर्ष 2014मध्ये सरकार पडल्यानंतर यूपीए सरकारच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेतील गैरव्यवस्थापन आणि व्यवस्थापनामध्ये दूरदर्शीपणा नसल्याने त्यांच्या कार्यकाळादरम्यान कमकुवत अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला. 

श्वेतपत्रिकेमध्ये (White Paper) असेही म्हटले आहे की, "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मनमोहन सिंग सरकारच्या त्या तत्त्वांचा त्याग केला, ज्याद्वारे आर्थिक उदारीकरण प्रक्रिया आणली गेली. तसेच वर्ष 2014मध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले तेव्हा अर्थव्यवस्थेची परिस्थिती नाजूक होती; सार्वजनिक आर्थिक स्थिती बिकट होती आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही झाला होता".

पूर्ण श्वेतपत्रिका येथे वाचा - 

काँग्रेसने प्रसिद्ध केले काळी पत्रिका

दरम्यान यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देणारी काळी पत्रिका (Black Paper) प्रसिद्ध केली. काँग्रेसने आपल्या काळ्या पत्रिकेला '10 वर्षे, अन्याय काळ' असे नाव दिले आहे.

आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची जात OBCमध्ये समाविष्ट केली? भाजपने दिले आरोपांना प्रत्युत्तर

Kilkari Programme : राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी योजना, मिळणार हे लाभ 

श्वेतपत्रिका म्हणजे काय? UPA सरकारचा आर्थिक गैरकारभार जनतेसमोर आणणार मोदी सरकार