सार

सध्या अनेक जण इंटरनेटवर नोकरी अनेक जण नोकरी शोधताना दिसून येत आहेत. त्यांच्यासाठी आता सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी आलेली दिसून येत आहे. भारतीय नौदलात नोकरीची संधी असून त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे. 

सध्या अनेक जण इंटरनेटवर नोकरी अनेक जण नोकरी शोधताना दिसून येत आहेत. त्यांच्यासाठी आता सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी आलेली दिसून येत आहे. भारतीय नौदलात नोकरीची संधी असून त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे, नौदलाने 300 शिकाऊ पदांसाठी ही भरती काढली असून त्यासाठीची अर्ज प्रक्रिया ही लवकर सुरु करण्यात आली आहे. 

कोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे? 
भारतीय नौदलाच्या 300 पदांसाठी ही भरती होणार असून ती कोण कोणत्या क्षेत्रातील लोकांची होणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. यात फिटर पदासाठी 50, मेकॅनिक पदासाठी 35, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी 26 जागा आहेत. शिपराइट 18, वेल्‍डर 15, मशीनिस्‍ट 13, एमएमटीएम 13, पाईप फिटर 13, पेंटर 9, इंस्ट्रूमेन्ट मेकॅनिक 7, शीट मेटल वर्कर 3, टेलर 3, पॅटर्न मेकर 2, फाऊन्ड्रीमॅन पदासाठीदेखील एक जागा आहे.

वयोमर्यादा आणि शिक्षणाची अट किती? 
भारतीय नौदलातील या पदासाठी वयाची अट ही 14 वर्षे आणि कमाल वयाची अट ही 18 वर्षे आहे. बिगर आयटीआय ट्रेडसाठी इयत्ता आठवी पास असणे गरजेचे आहे. फोर्जर हीट ट्रिटर या पदासाठी इयत्ता 10 पास असणे गरजेचे आहे.

शारीरिक योग्यतेची अट आणि आणि निवड कशी होणार? 
या पदांसाठी आपण अर्ज करत असाल तर उमेदवाराची उंची ही 150 सेमी तर वजन 45 किलोपेक्षा कमी नसावी. तसे छाती फुगवल्यानंतर ती 5 सेमीपेक्षा कमी नसावी. डोळ्यांची दृष्टी ही 6/6 पासून 6/9 पर्यंत असणे गरजेचे आहे. निवड होण्यासाठी उमेदवाराला आधी लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर मुलाखत होऊन अंतिम निवड करण्यात येईल. 
आणखी वाचा - 
मलेशियामध्ये दोन हेलिकॅप्टर्सचा झाला अपघात, त्यामधील सर्वच केबिन क्रूचा झाला मृत्यू?
मुलाने वडिलांची मार्कशीट केली सोशल मीडियावर व्हायरल, ती पाहून लोक लागले पोट धरून हसायला