सार

सोशल मीडियावर एक मार्कशीट व्हायरल होत आहे. या मार्कशीट मध्ये वडिलांची मार्कशीट मिळाली अशा प्रकारचे फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे. 

सोशल मीडियावर एक मार्कशीट व्हायरल होत आहे. या मार्कशीट मध्ये वडिलांची मार्कशीट मिळाली अशा प्रकारचे फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे. वडिलांची मार्कशीट व्हायरल करणाऱ्या मुलाला त्याचे वडील पास हो म्हणून अनेकवेळा बोलत होते, त्यालाच आता वडिलांची मार्कशीट सापडली आहे. त्यामुळे लोक कमेंट करून हसताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर पोस्ट झाली व्हायरल - 
या पोस्टवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट आणि लाईक्स केल्या आहेत. वडिलांची अशा प्रकारे थट्टा करणे मुलाला महागात पडेल असेच दिसत आहे. 3 लाख 87 हजार व्यूज आणि साडेचार हजारपेक्षा जास्त लाईक्स या पोस्टला मिळाल्या आहेत. लोकांनी या पोस्टवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. त्या कमेंट वाचून अनेकांना हसू आवरत नाहीये. त्यामुळे यावर कमेंट मोठ्या प्रमाणावर पडत आहेत. 

दहावीतील सर्व विषयांमध्ये नापास - 
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मार्कशीटसोबत एका मुलाचा आवाज ऐकायला येतो. या व्हिडिओमध्ये त्या मुलाने त्याच्या वडिलांची मस्करी केल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे तो व्हिडीओ पाहून लोक हसत आहेत. या व्हिडिओमध्ये मुलाचा आवाज येत असून तो म्हणतो की, "मित्रांनो, माझे वडील मला पास होण्यासाठी खूप ओरडायचे, पास हो म्हणायचे... आणि बघा ते दहावीत सर्व विषयात नापास झाले. ही त्यांची मार्कशीट आहे, पहा.
आणखी वाचा - 
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य मोठ्या युद्धासाठीही तयार होते? माजी हवाई दल प्रमुखांनी केला मोठा खुलासा
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात होणार अडचण, न्यायालयाने दिला 'हा' निर्णय