MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • E100 Fuel: पेट्रोल-चार्जिंगचं टेन्शन खल्लास! आता फक्त 60 रुपयांत धावणार गाडी

E100 Fuel: पेट्रोल-चार्जिंगचं टेन्शन खल्लास! आता फक्त 60 रुपयांत धावणार गाडी

E100 Fuel: भारताच्या इंधन क्षेत्रात आतापर्यंत गाड्यांमध्ये E20, E30 इथेनॉल वापरलं जात होतं. पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी E100 म्हणजेच 100% इथेनॉल वापराच्या फाईलवर सही केली आहे. यामुळे आता फक्त 60 रुपयांत इथेनॉल उपलब्ध होऊ शकतं.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 15 2026, 09:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
शेकडा 100 टक्के इथेनॉल इंधन
Image Credit : stockPhoto

शेकडा 100 टक्के इथेनॉल इंधन

भारताच्या ऑटोमोबाईल आणि इंधन क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली आहे. आतापर्यंत वाहनांमध्ये E20 किंवा E30 इथेनॉल वापरले जात होते. पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉल इंधन वापराच्या प्रस्तावावर सही केली आहे. यामुळे देशात पर्यावरणपूरक जैवइंधनावर (Biofuel) गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
फाईलवर सही करताना नितीन गडकरी
Image Credit : Asianet News

फाईलवर सही करताना नितीन गडकरी

नागपूरमध्ये झालेल्या साखर आणि जैवइंधन परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. '12 जूनच्या रात्री 8 वाजता मी 100 टक्के इथेनॉल इंधनाचा वापर कायदेशीर करणाऱ्या फाईलवर सही केली,' असं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे.

Related Articles

Related image1
Flex-Fuel: पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा! सरकार आणतंय स्वस्त इंधन, देशभरात ५००० नवे पंप
Related image2
पुढील 4 महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या किमती पेट्रोल कार एवढ्या होतील, Nitin Gadkari यांची घोषणा
36
22 लाख कोटी रुपयांची बचत
Image Credit : Gemini AI

22 लाख कोटी रुपयांची बचत

भारत सध्या आपल्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त कच्चं तेल परदेशातून आयात करतो. यासाठी देशाच्या तिजोरीतून दरवर्षी तब्बल 22 लाख कोटी रुपये बाहेर जातात. आता देशात तयार होणाऱ्या E100 इंधनाला कायदेशीर मान्यता मिळाल्याने, परदेशी कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होईल आणि भारताचे लाखो कोटी रुपये वाचतील.
46
शेतकऱ्यांना मोठा फायदा
Image Credit : X/Twitter

शेतकऱ्यांना मोठा फायदा

केंद्र सरकारच्या या धोरणामुळे देशातील शेतकऱ्यांना, विशेषतः ऊस आणि धान्य उत्पादकांना मोठा आर्थिक फायदा होईल. अतिरिक्त ऊस, मका आणि गोदामात पडून असलेलं धान्य थेट बायो-रिफायनरीमध्ये पाठवून शुद्ध इथेनॉल तयार केलं जाईल. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत मिळेल.
56
वॅगनआरसह अनेक गाड्या बाजारात येणार
Image Credit : Instagram

वॅगनआरसह अनेक गाड्या बाजारात येणार

मारुती कंपनी याच जून महिन्यात आपल्या लोकप्रिय 'वॅगनआर' (WagonR) कारचं 100% इथेनॉलवर चालणारं मॉडेल आणणार आहे. टोयोटा, ह्युंदाई, एमजी मोटर्स आणि हिरो मोटोकॉर्प या कंपन्याही पुढील दीड महिन्यात आपल्या E-100 इंधनावर चालणाऱ्या कार आणि बाईक्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
66
फ्लेक्स फ्युएल वाहन
Image Credit : X/Twitter

फ्लेक्स फ्युएल वाहन

सध्या बाजारात 20% इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E20) उपलब्ध आहे आणि ते यशस्वीही ठरलं आहे. पण आता E-100 नियमांना मंजुरी मिळाल्यामुळे, ऑटोमोबाईल कंपन्या पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या 'फ्लेक्स-फ्युएल व्हेइकल्स' (FFVs) तयार करण्यासाठी मोठी गुंतवणूक करतील.

About the Author

MD
Marathi Desk 1
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jaipur Attack: जयपूरमध्ये CJP नेते अभिजीत दिपकेंना कानाखाली, भर गर्दीत नेमकं काय घडलं?
Recommended image2
Now Playing
हुसेन दलवाई यांनी ओवेसींच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली | Owaisi | TMC | BJP
Recommended image3
Monsoon Update : शेतकऱ्यांची चिंता वाढली! मान्सून दाखल झाला, पण पाऊस मात्र गायब
Recommended image4
Now Playing
नाना पटोले यांचा मोहन भागवतांवर निशाणा, पाकिस्तानचा उल्लेख | BJP | RSS | Ram Mandir
Recommended image5
Now Playing
तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट | RajThackeray | TejaswiniPandit | MNS
Related Stories
Recommended image1
Flex-Fuel: पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा! सरकार आणतंय स्वस्त इंधन, देशभरात ५००० नवे पंप
Recommended image2
पुढील 4 महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या किमती पेट्रोल कार एवढ्या होतील, Nitin Gadkari यांची घोषणा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved