रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेकडून भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये नातेसंबंध बिघडले आहेत.

मुंबई : भारत-अमेरिकेमधील व्यापार करार वाटाघाटी आणि टॅरिफ टेन्शनदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या विधानानुसार, ट्रम्प यांनी म्हटले मला पूर्णपणे विश्वास आहे की, वॉशिंग्टन आणि दिल्लीमध्ये सुरू असणाऱ्या चर्चेवर लवकरच तोडगा निघेल. याशिवाय सर्व प्रकारच्या व्यापारामधील अडथळे दूर करण्यासाठी येणाऱ्या आठवड्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधणार आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, मला हे सांगताना आनंद होतोय भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील व्यापार अडथळे दूर करण्यासाठी संवाद सुरू आहे. येणाऱ्या आठवड्यांमध्ये मी माझे चांगले मित्र, पीएम मोदी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, दोन्ही महान देशांसाठी एक योग्य निर्णयावर पोहोचण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही.

पीएम मोदी यांची प्रतिक्रिया

ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, "भारत आणि अमेरिका उत्तम मित्र आणि नॅच्युरल पार्टनर आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, आमच्या व्यापार वाटाघाटी भारत-अमेरिका भागीदारीसाठी अमर्यादित शक्यता उघडतील.आमच्या टीम या चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यास देखील उत्सुक आहे. एकत्रितपणे आपण दोन्ही देशांच्या लोकांसाठी एक चांगले आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करू."

Scroll to load tweet…

दरम्यान, याआधी 6 सप्टेंबरला ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये भारत-अमेरिकेच्या संबंधांना खास नाते असल्याचे म्हटले होते. यावेळी ट्रम्प यांनी म्हटले, मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच चांगले मित्र राहू. मी नेहमीच तयार आहे, मी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. त्यांच्यासोबतची मैत्री नेहमीच राहिल. पण सध्या पीएम मोदी काही करत आहे ते मला आवडत नाही आहे. पण भारत आणि अमेरिकेमध्ये एक खास नाते आहे. चिंतेची काहीच गरज नाही. दोघांमध्ये कधी-कधी अशा गोष्टी घडतात.

भारतावर 50 टक्के टॅरिफ

अमेरिकेने भारतावर अधिक टॅरिफ वसूल करणे आणि रूसकडून तेल खरेदी करण्याच्या कारणास्तव एकूण 50 टक्के टॅरिफ लावला आहे. या दोन्ही देशांमध्ये सध्या मीठाचा खडा पडला आहे. पण तरीही दोन्ही देशांच्या टीम उत्तम व्यापार करारावर गेल्या 6 महिन्यांपासून बातचीत करत आहेत.