सार

रामनगरी अयोध्यामध्ये राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावेळी येथे भाविक भक्त देशभरातून आल्याचे सांगण्यात येत आहे. राम लल्लाचा सूर्य टिळक कार्यक्रम हा दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास होणार आहे.

रामनगरी अयोध्यामध्ये राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावेळी येथे भाविक भक्त देशभरातून आल्याचे सांगण्यात येत आहे. राम लल्लाचा सूर्य टिळक कार्यक्रम हा दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास होणार आहे. यावेळी सूर्याची किरणे ही रामाच्या चेहऱ्यावर येतील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाविक भक्तगण अयोध्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. 

सूर्य टिळक कार्यक्रमाची माहिती - 
सूर्य टिळक या कार्यक्रमाची तयारी ही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी येथील तज्ञांसोबत सूर्याच्या हालचालींसोबत वेळेची गणना कशी करता येईल यासाठी सहकार्य केले आहे. राम लल्लाचा सूर्याचा अभिषेक हा वेळेवर आणि उच्च दर्जाचा होणार असल्याची माहिती तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने देण्यात आले आहे. 

ट्रस्टने दिली माहिती - 
या कार्यक्रमाची माहिती देताना ट्रस्टने म्हटले आहे की, सूर्यकिरण सुरुवातीला मंदिराच्या वरच्या मजल्यावर बसवलेल्या आरशावर पडतील, त्यानंतर तीन लेन्सच्या मदतीने ते मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बसवलेल्या दुसऱ्या आरशात पडून राम लल्लाच्या चेहऱ्यावर येतील, असं सांगण्यात आले आहे. राम लल्लाचा हा उत्सव पाहण्यासाठी भाविक भक्त मोठ्या उत्साहाने येथे सहभागी झाले आहेत. 

या प्रकल्पाचे नेतृत्व तज्ज्ञ करणार असून प्रा. प्रदीप कुमार रामनचर्ला आणि प्रा. देवदत्त घोष यांचा यामध्ये समावेश होतो. राम मंदिरातील राम लल्लावर सूर्यप्रकाश पडतील अशा गर्भगृहाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्या मागणीनुसार ही पद्धत येथे विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी राम नवमीच्या निमित्ताने सजावट केली आहे. 
आणखी वाचा - 
Loksabha Elections 2024 - देशाच्या जनतेला 2047 मध्ये भारत विकसित झालेला पाहायचाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये केली घोषणा
Lok Sabha Election 2024 : अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर ; भाजपची 12 वी यादी प्रसिद्ध