भाजपवर आमदारांना खरेदी करण्याचा आरोप लावणे AAP पक्षाला पडले भारी, दिल्ली पोलीस थेट पोहोचली केजरीवाल यांच्या निवासस्थानी

| Published : Feb 03 2024, 12:35 PM IST / Updated: Feb 03 2024, 12:37 PM IST

Delhi Police Crime Branch
भाजपवर आमदारांना खरेदी करण्याचा आरोप लावणे AAP पक्षाला पडले भारी, दिल्ली पोलीस थेट पोहोचली केजरीवाल यांच्या निवासस्थानी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

आम आदमी पक्षाने भाजपवर आमच्या पक्षातील आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. यावरुनच आता दिल्ली पोलीस शनिवारी दुसऱ्यांदा नोटीस घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे.

Delhi Police at CM Arvind Kejriwals Home : आम आदमी पक्षाने (Aam Admi Party) गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप (BJP)पक्षावर मोठा आरोप लावला होता. आरोप लावत आम आदमी पक्षाने म्हटले होते की, आमच्या पक्षातील आमदारांना भाजपकडून खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यासाठी आमदारांना 25 कोटी रुपये देखील ऑफर केले जातायत. अशातच भाजपने आम आदमी पक्षाच्या या आरोपांवरुन पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली. पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांना नोटीस देण्यास आले होते. खरंतर, आम आदमी पक्षाने भाजपवर आमदारांना खरेदी करण्याचा आरोप लावला होता. पोलीस दुसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे.

याआधी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) गुन्हे शाखेचे पथक केजरीवाल आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी (Atishi Marlena) यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांची नोटीस स्विकारण्यास त्यांनी नकार दिला होता. यानंतर आज (3 जानेवारी) पुन्हा दिल्ली पोलिसांचे पथक नोटीस घेऊन आले.

आमदारांना 25 कोटी रुपये ऑफर केल्याचा भाजपवर AAPचा आरोप
गेल्या आठवड्यात आम आदमी पक्षाने भाजपवर आरोप लावत म्हटले होते की, BJP ने आमच्या पक्षातील सात आमदारांना 25-25 हजार कोटी रुपयांची ऑफर दिली होती. खरंतर पैसे आमदारांना पक्षाला सोडचिठ्ठी देण्यासाठी देण्यात आले होते. याशिवाय भाजप दिल्लीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आम आदमी पक्षाने म्हटले होते. अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधित सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर करत आरोप लावले होते.

मंत्री आतिशींनी दिली प्रतिक्रिया
दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, भाजपने ऑपरेशन लोटस 2.0 लाँच केले आहे. गेल्या वर्षी (2023) देखील भाजपने आमदारांना खरेदी करण्याचा असाच प्रयत्न केला होता. पण अयशस्वी झाले.

भाजपने केली पोलिसात तक्रार
आम आदमी पक्षाने लावण्यात आलेल्या आरोपांवरुन दिल्लीतील भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा (Virendra Sachdeva) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे एक शिष्टमंडळ 30 जानेवारीला पोलीस आयुक्त संजय अरोडा यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी भाजप नेत्यांनी आम आदमी पक्षाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याशिवाय अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांबद्दल चौकशी करण्याची मागणी केली होती.

आणखी वाचा : 

Delhi Liquor Scam : ईडीच्या पाचव्या समन्सलाही अरविंद केजरीवाल यांनी धुडकावले, APP पक्षाने म्हटले...

Varanasi : ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात दररोजच्या पूजेला परवानगी, 6 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

हेमंत सोरेन यांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल, नक्की काय आहे प्रकरण?