MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Delhi Murder : IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माजी नोकराची क्रूरता

Delhi Murder : IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माजी नोकराची क्रूरता

दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या आणि कथित बलात्कार प्रकरणात माजी घरगुती नोकर राहुल मीणाला अटक करण्यात आली आहे. पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, जी पाहून पोलीसही चक्रावले.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 24 2026, 12:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
हत्या आणि बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Image Credit : X

हत्या आणि बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

दिल्लीत एका IRS अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीची हत्या आणि बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधून उघड झालंय की, तिने शेवटच्या श्वासापर्यंत आरोपी माजी नोकर राहुल मीणाशी संघर्ष केला होता. तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा सापडल्या आहेत. पीडितेचे आई-वडील जिमला गेले असताना आरोपीने घरात घुसून हा गुन्हा केला.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधील तपशील अत्यंत भयानक
Image Credit : X

पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधील तपशील अत्यंत भयानक

पोस्ट-मॉर्टम रिपोर्टमधील तपशील अत्यंत भयानक आहेत. रिपोर्टनुसार, पीडितेच्या चेहऱ्यावर जड वस्तूने हल्ला केल्याच्या गंभीर जखमा होत्या, ज्यात नाकाचं हाड मोडलं होतं. तिच्या हाता-पायांवर ओरखडे आणि जखमा होत्या, जे तिच्या संघर्षाचे पुरावे आहेत. गळ्याच्या स्नायूंमध्ये रक्तस्त्राव आणि थायरॉईड कार्टिलेजमध्ये फ्रॅक्चर आढळल्याने, गळा दाबून श्वास कोंडल्याने (asphyxia) मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली आहे.

Related Articles

Related image1
Thane Crime News : ठाण्यातील भोंदू बाबाचा हाय-प्रोफाइल स्कॅम; पूजेच्या नावाखाली पैसे, गोव्यात मौजमजा
Related image2
IPL 2026 Gujarat vs Delhi: गिल, बटलर, सुंदरची बॅटिंगने धुलाई! दिल्लीसमोर २११ धावांचं डोंगराएवढं आव्हान
37
पोलीस तपासात उघड...
Image Credit : X

पोलीस तपासात उघड...

पोलीस तपासात उघड झालंय की, आरोपी राहुल मीणा आधी याच घरात नोकर होता. त्याने डुप्लिकेट चावी वापरून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने पीडितेवर जड वस्तूने हल्ला केला आणि मोबाईल चार्जिंग केबलने तिचा गळा दाबला. हल्ला केल्यानंतर पीडिता बेशुद्ध पडल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
47
लॉकर तोडून रोकड आणि दागिने लुटले
Image Credit : X

लॉकर तोडून रोकड आणि दागिने लुटले

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तो पीडितेला तिच्या टेरेसवरील खोलीतून खाली खेचून घेऊन आला, जिथे ती सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करत होती. त्याने तिचे फिंगरप्रिंट वापरून लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी ठरल्यावर स्क्रू ड्रायव्हरने लॉकर तोडून रोकड आणि दागिने लुटले. पळून जाण्यापूर्वी त्याने ओळख लपवण्यासाठी रक्ताने माखलेले कपडेही बदलले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
57
सीसीटीव्ही फुटेज समोर
Image Credit : X

सीसीटीव्ही फुटेज समोर

CCTV फुटेजमध्ये आरोपी सकाळी ६:३० वाजता कॉलनीत शिरताना आणि ७:२० वाजता बाहेर पडताना दिसला. ही वेळ पीडितेचे आई-वडील घरी परतण्यापूर्वीची होती. यावरून हे स्पष्ट होतं की, हा गुन्हा अत्यंत पूर्वनियोजित होता.
67
आरोपीला अटक
Image Credit : X

आरोपीला अटक

पोलिसांनी आरोपीला द्वारकामधील एका हॉटेलमधून अटक केली. तपासात असंही समोर आलं आहे की, या घटनेच्या काही तास आधी त्याने राजस्थानच्या अलवरमध्ये आपल्या एका मित्राच्या पत्नीवरही कथित बलात्कार केला होता. या खुलाशामुळे प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं असून, पोलीस आता सर्व घटनांची साखळी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
77
फॉरेन्सिक टीमने काय म्हटले?
Image Credit : X

फॉरेन्सिक टीमने काय म्हटले?

फॉरेन्सिक टीमने व्हिसेरा, नखांचे नमुने, रक्त आणि स्वॅब जप्त केले आहेत. या तपासणीतून लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्हेगारी पैलूंची पुष्टी होण्याची शक्यता आहे. पोलीस हे संपूर्ण प्रकरण अत्यंत संवेदनशील मानून प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत आहेत. दुसरीकडे, राहुल मीणाच्या अलवरमधील गावातले लोक त्याच्या या कृत्याने हैराण झाले आहेत. त्याच्या घरच्यांचा तर यावर विश्वासच बसत नाहीये.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Robinhood Stock: ट्रुइस्टने वाढवले टार्गेट, वॉल स्ट्रीटवरही चर्चा
Recommended image2
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न! कालीघाटमधील धक्कादायक घटना
Recommended image3
Harsh Goenka: हर्ष गोयंकांनी शेअर केला वाळूत भाजलेल्या बटाट्यांचा व्हिडिओ, नेटकऱ्यांना आठवले जुने दिवस
Recommended image4
Now Playing
Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
Recommended image5
Now Playing
Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती
Related Stories
Recommended image1
Thane Crime News : ठाण्यातील भोंदू बाबाचा हाय-प्रोफाइल स्कॅम; पूजेच्या नावाखाली पैसे, गोव्यात मौजमजा
Recommended image2
IPL 2026 Gujarat vs Delhi: गिल, बटलर, सुंदरची बॅटिंगने धुलाई! दिल्लीसमोर २११ धावांचं डोंगराएवढं आव्हान
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved