निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी असते. त्यातही भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी असते. त्यातही भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर आता मोठा फटका बसला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. 

Scroll to load tweet…

अर्चना चाकूरकर यांच्या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यामध्ये भाजप पक्षाला अजून बळकटी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी पक्षप्रवेश केला आहे. अर्चना चाकूरकर या अमित देशमुख यांच्या विरोधात विधानसभेला उभ्या राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

यावेळी बोलताना अर्चना चाकूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मी गेली 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते. माझा हा राजकीय प्रवासाचा महत्वपूर्ण निर्णय आहे. मी आज भाजपमध्ये प्रवेश करून गणेशा करत आहे. नरेंद्र मोदी साहेबांचा प्रवास आम्ही बारकाईन बघत होतो. संसदेतले पहिले महिला विधेयक पारीत झालं, तो एक ऐतिहासिक निर्णय होता. आरक्षणामुळे महिलांना संधी मिळेल. देवेंद्र फडणवीस हे जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यासाठी प्रयत्न करेल असे म्हटले आहे. 
आणखी वाचा - 
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव यांच्यासह 'या' व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती मुर्मू यांनी केला सन्मान
दिल्ली सरकारमधील मंत्री कैलास गेहलोत हे ईडी कार्यालयात हजर, जबाबासाठी बोलवल्याचे दिले कारण