राज ठाकरे इव्हेन्ट सेलिब्रेटी असून दुसऱ्याच्या मंचावरून मनोरंजन करतात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली टीका

| Published : May 15 2024, 03:58 PM IST

raj thakre
राज ठाकरे इव्हेन्ट सेलिब्रेटी असून दुसऱ्याच्या मंचावरून मनोरंजन करतात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली टीका
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे स्क्रिप्ट लिहून इव्हेन्ट करणारे सेलिब्रेटी असल्याची बोचरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

काँग्रेस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना म्हटले आहे की, राज ठाकरे हे इव्हेन्ट सेलिब्रेटी असून ते प्रत्येक ठिकाणी जाऊन  स्क्रिप्टनुसार दिलेली भूमिका पार पडत असतात. राज ठाकरे एका कार्यक्रमासाठी किती घेतात याची माहिती काढली पाहिजे आणि त्यांचा पिक्चर आणि सीरिअल चालत नसल्यामुळे ते दुसऱ्याच्या स्टेजवर जाऊन बोलतात असेही वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. 

राज ठाकरे स्क्रिप्टनुसार करतात काम - 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांना दिलेल्या स्क्रिप्टनुसार काम करतात, त्यांचे चित्रपट आणि मालिका चालत नसल्यामुळे दुसऱ्याच्या स्टेजवर जाऊन बोलत असल्याचा टोला यावेळी विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.राज ठाकरे यांनी भूमिका बदलली असून ते दुसऱ्याच्या मंचावरून बोलत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आम्ही पैसे देऊन सेलिब्रेटी आणतो आणि कार्यक्रम करतो हे म्हणायला यावेळी वडेट्टीवार विसरलेले नाहीत. 

महाविकास आघाडीला  मिळणार इतक्या जागा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांची भीती आहे. नरेंद्र मोदी हे महाराष्ट्ट्रात मोठ्या प्रमाणावर सभा घेत असून जिल्हा परिषदेला घेत नाहीत इतक्या सभा यावेळी लोकसभेला घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीला राज्यात 36 जागा मिळतील असा विश्वास वडेट्टीवार यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. राज्यातील कांदा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक चालू आहे. 

पंतप्रधानांची नाशिक येथील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सभा घेतली जाणार आहे. घाटकोपरमध्ये बॅनर पडून लोकांचा मृत्यू झाला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होत आहे. भाजपच्या संवेदनाच मेल्याचा उल्लेख यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 
आणखी वाचा - 
इंडिया आघाडीला बहुमतापेक्षा मिळणार जास्त जागा, काँग्रेसच्या 'या' नेत्याने केला दावा
गुगलच्या वार्षिक डेव्हलपर इव्हेंटमध्ये जेमिनी 1.5 केले सादर, अजून झाले लॉन्च असे काही की...