गुगलच्या वार्षिक डेव्हलपर इव्हेंटमध्ये जेमिनी 1.5 केले सादर, अजून झाले लॉन्च असे काही की...

| Published : May 15 2024, 12:05 PM IST

google 03.jp

सार

गुगलच्या झालेल्या वार्षिक डेव्हलपर इव्हेंटमध्ये जेमिनी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारती नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले. तसेच यावेळी जिमिनी हे अँप आणि जेमिनी इन कॅमेरा आणि गुगल फोटोजची माहिती देण्यात आली. 

गुगलच्या वार्षिक डेव्हलपर इव्हेन्टची दरवर्षी आवर्जून वाट पाहिली जाते, तो यावर्षीचा कार्यक्रम पार पडला असून यामध्ये नवीन प्रोडक्ट्स आणि फीचरची घोषणा करण्यात आली आहे. जेमिनी या गुगलच्या एआय मॉडेलबाबत यावेळी माहिती देण्यात आली असून हे मॉडेल जगभरात जवळपास दोन अब्ज लोक वापरत असल्याचा दावा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केला आहे. 

नवीन फीचर्सबद्दल जाणून घ्या - 
गुगलने लॉंच केलेल्या नवीन फीचर्सबद्दल माहिती जाणून घ्यायला हवी. जेमिनी एआयचे नवीन मॉडेल यावेळी सादर करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती या कार्यक्रमात यावेळी देण्यात आली आहे. जेमिनी अँपचे यावेळी लॉन्चिंग करण्यात आले असून यामधील फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. जेमिनी एआयमध्ये नवीन काय असेल याबद्दल युझरला प्रतीक्षा लागून राहिली होती. 

Gemini App - 
जेमिनी अँपमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्समध्ये युजर्ससोबत ऑडिओ संवाद साधता येईल अशी पद्धती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या फीचरला लाईव्ह असे नाव देण्यात आले असून या फीचरचा अनुभव अगदी नैसर्गिक पद्धतीने आपण घेऊ शकाल, असे सांगितले आहे. या अँपवर आपण आपल्या दररोजच्या जगण्यातील काही निर्णय घेऊ शकणार आहेत. यामध्ये खासकरून एखादी ट्रिप प्लॅन करणे, रेस्टोरंट सर्च करणे इत्यादी कामांचा उल्लेख आहे. सोबतच जेमिनी इन कॅमेरा आणि गुगल फोटोज ही पद्धत आली आहे.
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर, नाशिकच्या सभेनंतर मुंबईत करणार रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे उमेदवारी अर्ज भरताना केले जोरदार शक्तिप्रदर्शन, महाराष्ट्रातील कोण कोण नेते होते उपस्थित?