हार्दिक पांड्या आणि लसिथ मलिंगा यांच्यात वाद? दोघांचा व्हिडीओ झाला व्हायरल

| Published : Mar 29 2024, 09:11 PM IST

Mumbai-Indians-divided-into-hardik-and-rohit-camp

सार

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या कायमच अडचणीत येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्स हा संघ सलग दोन सामने हारला असून आगामी काळात त्याच काय होत हे लवकरच लक्षात येईल.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या कायमच अडचणीत येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्स हा संघ सलग दोन सामने हारला असून आगामी काळात त्याच काय होत हे लवकरच लक्षात येईल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसारित झाला असून यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हा मलिंगाला आलिंगन देताना त्याला लांब सारत असल्याचं दिसून आले आहे. 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांच्याशी संबंधित एका व्हिडिओने सोशल मीडियावर वादळ उठवले आहे. या व्हिडिओमध्ये लसिथ मलिंगाला हार्दिक पांड्या दूर सारत आहे. मलिंगा हा संघाचा प्रमुख प्रशिक्षक असून हार्दिक असे का करत आहे ते समजलेलं नाही. हस्तांदोलनानंतर हार्दिक लांब सारत असल्याचे दिसत आहे. 

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्यानंतर फॅन्स नाराज होते कारण त्यांना रोहित शर्मा हाच कर्णधार असावा अशी इच्छा होती. मुंबई इंडियन्सचे खेळाडू मैदानात आल्यानंतर फॅन्स रोहित, रोहित हा आवाज देत असल्याचे दिसून येत होते. हार्दिक पांड्याच्या कंर्णधारपदात मुंबई इंडियन्स संघ जिंकतो का हरतो ते लक्षात घ्यायला हवे. 
आणखी वाचा - 
NIA ने बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात दोन संशयितांचे फोटो केले जारी, 10 लाखांचे बक्षीस केले जाहीर
निवडणूक काळात आचारसंहितेची कारवाई कधी होऊ शकते? आपण किती रोकड जवळ बाळगू शकतो, जाणून घ्या