सार

दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात लोकसभेच्या जागांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थिती लावली होती.

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता काँग्रेसमधील उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणुक समितीने बैठक बोलावली होती. दरम्यान, बैठकीच्या पहिल्या दिवशी उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली नाही. अद्याप पक्षाकडून कोणाला कोणत्या जागेवर उतरवले जाणार याचा सस्पेन्स कायम आहे. सूत्रांनुसार, कांग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी शुक्रवारी (8 मार्च) जारी केली जाऊ शकते.

केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उपस्थिती लावली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीला राहुल गांधी उपस्थिती लावणार होते. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) जयपुरमध्ये असल्याने त्यांना बैठकीत सहभागी होता आले नाही.

केरळात पक्षाच्या स्क्रिनिंग कमेटीने वायनाज जागेवरुन राहुल गांधी यांच्या नावाची शिफारस केली आहे. सूत्रांनुसार, राहुल गांधी वायनाड येथील खासदार असल्याने तेथून त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट झाले नाहीय की राहुल गांधी वायनाडशिवाय अमेठी येथून लढणार आहेत.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत या चेहऱ्यांना मिळू शकते स्थान
काँग्रेसच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतील याबद्दल अनिश्चितता आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतेय की, सोनिया गांधी यांची रिकामी असलेली रायबरेली येथील जागेवरुन त्यांनी निवडणूक लढवावी.

याशिवाय पक्षाकडून जारी केल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत कोणाला स्थान मिळाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच. पण तिरुवनंतपुरम येथून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते.

छत्तीगड येथून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगाव, ताम्रध्वज साहू यांना दुर्ग येथून, जोत्सना महंत यांना कोरवा आणि शिव हेडरिया यांना जांजगीर-चांपा जागेवरुन निवडणुकीसाठी उतरवले जाऊ शकते. याशिवाय कर्नाटकातील चार ते पाच लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आलेली नाहीत.

दिल्लीच्या जागांवर मंथन
सूत्रांनुसार, बैठकीत काँग्रेसचा गड राहिलेल्या गुलबर्ग जागेवर चर्चा करण्यात आली नाही. अशी बातमी होती की, मल्लिकार्जुन खरगे यांचा जावई राधाकृष्ण डोड्डामणि यांना तिकिट दिले जाऊ शकते. दिल्ली काँग्रेस युनिटने सात लोकसभा जागांसाठी उमेदावारांची एक मोठी यादी सादर केली असून त्यावर विचार केला जात आहे.

पक्षाच्या हायकमांडने दिल्लीच्या जागांवर मंथन करण्यासाठी आणि उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यासाठी पुन्हा बैठक बोलावली आहे. चांदनी चौक येथील जागेसाठी जेपी अग्रवाल, संदीप दीक्षित आणि अलका लांबा यांच्या नावाची चर्चा झाली आहे. उत्तर पूर्व दिल्ली येथून अरविंद सिंह लवली आणि अनिल चौधरी यांचे नाव समोर आले आहे. उत्तर पश्चिम दिल्ली येथून राजकुमार चौहान आणि उदित राज यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

आणखी वाचा : 

तुरुंगात असलेल्या UP च्या समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्यासह भावाच्या ठिकाणांवर ईडीची छापेमारी

दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विमानात धूम्रपान करणे प्रवाशाला पडले महागात, केली तुरुंगात रवानगी

मुंबईला पहिली पॉड टॅक्सी सेवा मिळणार, MMRDA ने ₹1,016.38 कोटी किमतीच्या ARTS प्रकल्पाला दिली मान्यता