सार

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना राणावत हिला भाजपकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. तिकीट जाहीर केल्यानंतर तिने प्रचारात मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना राणावत हिला भाजपकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. तिकीट जाहीर केल्यानंतर तिने प्रचारात मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाने प्रचाराला सुरुवात केली आहे. आज तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक ट्विट केले असून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटले? 
या ट्विटमध्ये कंगना म्हणते की, ""मी गोमांस किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लाल मांस खात नाही, माझ्याबद्दल पूर्णपणे निराधार अफवा पसरवल्या जात आहेत हे लज्जास्पद आहे, मी योग आणि आयुर्वेदिकांचा पुरस्कार आणि प्रचार करत आहे. अनेक दशकांपासूनची जीवनशैली आता माझी प्रतिमा डागाळण्यासाठी असे डावपेच कामी येणार नाहीत. माझे लोक मला ओळखतात आणि त्यांना माहित आहे की मी एक अभिमानी हिंदू आहे आणि त्यांना काहीही दिशाभूल करू शकत नाही, जय श्री राम"
 

कंगना सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह असून ती येथून प्रचाराच्या संदर्भातील अपडेट देत आहे. हिमाचल प्रदेशाच्या या कन्येला तिकीट देऊन भाजपला येथून विजय मिळवायचा आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचे राज्य म्हणून हिमाचल प्रदेशला ओळखले जाते. कंगना राणावत जिंकते का नाही, हे लवकरच निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येईल. 
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 व्या शतकातील Vikasit Bharat ची केली होती भविष्यवाणी, वर्ष 1999 मधील व्हिडीओ व्हायरल (Watch)
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ठरल्यास राहुल गांधींनी माघार घ्यावी, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी दिला सल्ला