सुदर्शन पटनायक यांनी 2 टन कांदे व वाळूपासून तयार केला सांताक्लॉज, जगाला दिला हा महत्त्वपूर्ण संदेश

| Published : Dec 25 2023, 10:13 AM IST / Updated: Dec 26 2023, 12:32 PM IST

chritmas

सार

Christmas 2023 : ख्रिसमस सणानिमित्त जगप्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी समुद्रकिनाऱ्यावर सांताक्लॉजची सुंदर कलाकृती साकारली आहे. 

Christmas 2023 : जगप्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर ख्रिसमस सणानिमित्त जगाला सुंदर संदेश देण्याचं काम केलं आहे. पटनायक यांनी वाळू व कांद्याच्या मदतीने सांताक्लॉज तयार केला आणि याद्वारे जगाला महत्त्वपूर्ण सुंदर संदेश दिला आहे.

कांदे आणि वाळूच्या मदतीने सुदर्शन पटनायक यांनी (Sudarsan Pattnaik) सांताक्लॉजची सुंदर कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीच्या माध्यमातून पटनायक यांनी झाडे लावून पर्यावरण वाचवण्यासाठी कार्य करण्याचा संदेश दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन पटनायक यांनी जवळपास दोन टन कांद्यांचा वापर करून सांताक्लॉजची कलाकृती साकारली आहे. हा सुंदर देखावा पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर लोक गर्दी करत आहेत.

कलाकृतीबाबत काय म्हटले सुदर्शन पटनायक 

जग प्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी सांगितले की, दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने आम्ही काही तरी नवीन आणि क्रिएटिव्ह आर्ट तयार करतो. याद्वारे आम्ही जगाला संदेश देण्याचाही प्रयत्न करतो.

या वर्षी आम्ही कांद्यांचा वापर करून सांताक्लॉजची मोठी कलाकृती साकारली आहे. 100 फूट लांब, 40 फूट रुंद आणि 20 फूट उंच अशी ही कलाकृती आहे. यासाठी आम्ही जवळपास दोन टन कांद्यांचा वापर केला आहे. यंदा आम्ही ख्रिसमस सणाच्या निमित्ताने झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

View post on Instagram
 

कांद्यांपासून तयार केला सांताक्लॉज

ओडिशातील सँड आर्टिस्ट यांनी सांगितले की, आपण अधिकाधिक झाडे लावणे ही आताच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. यामुळेच कलाकृती तयार करण्यासाठी आम्ही कांद्याचा वापर केला आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी सुमारे आठ तासांचा कालावधी लागला. पटनायक पुढे असेही म्हणाले की, हवामानातील बदल आणि त्यामुळे होणाऱ्या अन्य परिणामांबाबत आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच आम्ही झाडे लावा व झाडे वाचवण्याचा संदेश याद्वारे जगाला दिला आहे.

आणखी वाचा : 

रक्तशुद्धी करायचीय? मग जाणून घ्या हे नैसर्गिक रामबाण उपाय

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण

Heart Attack : खरंच या वेळेस जेवल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो? जाणून घ्या रीसर्चमधील माहिती