Padma Awards 2024 : पद्म पुरस्कारांची घोषणा, समाजासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या नायकांचा गौरव

| Published : Jan 26 2024, 09:06 AM IST / Updated: Jan 26 2024, 05:37 PM IST

Padma Awards 2024 Nominations

सार

Padma Awards 2024: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 5 पद्मविभूषण (Padma Vibhushan Awards), 17 पद्मभूषण (Padma Bhushan Awards 2024) व 110 पद्मश्री असे एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Padma Awards 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रामध्ये असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (25 जानेवारी) पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली. पाच जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला (Vyjayantimala), अभिनेता कोनिडेला चिरंजीवी (Konidela Chiranjeevi), प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम् (Padma Subrahmanyam) आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (Bindeshwar Pathak) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार  

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. यामध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक (Ram Naik), संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ज्ञ आश्विन मेहता,  कुंदन व्यास, जेष्ठ पत्रकार होर्मुसजी एन कामा यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे(Manohar Krishana Dole) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे. 
  • साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काझी (Zahir I Kazi) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 
  • वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (Chandrashekhar Mahadeorao Meshram) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 
  • व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया (Kalpana Morparia) यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे.
  • बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर (Shankar Baba Pundlikrao Papalkar) यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.
  • क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे (Uday Vishwanath Deshpande) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून . जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे .50 देशांतील 5 हजारहून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षण दिले.
  • गोव्यातील संजय अनंत पाटील (Sanjay Anant Patil) यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नैसर्गिक शेतीची कास धरत त्यांनी शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्यांतील सहा मान्यवरांना पद्मभूषण (Padma Vibhushan Awards 2024) आणि सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार (Padma Bhushan Awards 2024) जाहीर झाले आहेत.

या मान्यवर पुरस्कारार्थींचे सार्वजनिक कार्य, सामाजिक आणि वैद्यकीय, कला, क्रीडा (Sports), साहित्य- शिक्षण, उद्योग व व्यापार, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तरूण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या सर्वांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यात योगदान दिले आहे. या सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले आहे.

View post on Instagram
 

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी

  • एम. फातिमा बीबी (मरणोत्तर) - सार्वजनिक कार्य, केरळ
  • होरमुसजी एन. कामा - साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता, महाराष्ट्र
  • मिथुन चक्रवर्ती - कला, पश्चिम बंगाल
  • सिताराम जिंदाल - उद्योग, कर्नाटक
  • यंग लिऊ - उद्योग, तैवान
  • अश्विन बालचंद मेहता - वैद्यकिय, महाराष्ट्र
  • सत्यव्रत मुखर्जी (मरणोत्तर) - सार्वजनिक कार्य, पश्चिम बंगाल
  • राम नाईक - सार्वजनिक कार्य, महाराष्ट्र
  • तेजस मधुसूदन पटेल - वैद्यकीय, गुजरात
  • ओलांचेरी राजगोपाल - सार्वजनिक कार्य, केरळ
  • दत्तात्रय मायाळू उर्फ राजदत्त - कला, महाराष्ट्र
  • तोगदाम रिपोचे (मरणोत्तर) - अध्यात्म, लडाख
  • प्यारेलाल शर्मा - कला, महाराष्ट्र
  • चंदेश्वर प्रसाद ठाकूर - वैद्यकीय, बिहार
  • उषा उत्थुप - कला, पश्चिम बंगाल
  • विजयकांत (मरणोत्तर)- कला, तामिळनाडू
  • कुंदन व्यास- साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता, महाराष्ट्र

पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

  • खलील अहमद - कला, उत्तर प्रदेश
  • बद्रप्पन एम - कला, तामिळनाडू
  • काळुराम बामनिया - कला, मध्य प्रदेश
  • रेझवाना चौधरी बन्या - कला, बांगलादेश
  • नसीम बानो - कला, उत्तर प्रदेश
  • रामलाल बरेथ - कला, छत्तीसगड
  • गीता रॉय बर्मन - कला, पश्चिम बंगाल
  • पार्बती बरुआ - समाजसेवा, आसाम
  • सर्वेश्वर बसुमतरी अन्य - शेती, आसाम
  • सोम दत्त बट्टू - कला, हिमाचल प्रदेश
  • तकदिरा बेगम - कला, पश्चिम बंगाल
  • सत्यनारायण बेलेरी - अन्य - शेती, केरळ
  • द्रोण भुयान - कला, आसाम
  • अशोक कुमार बिस्वास - कला, बिहार
  • रोहन बोपन्ना - क्रीडा, कर्नाटक
  • स्मृती रेखा चकमा - कला, त्रिपुरा
  • नारायण चक्रवर्ती - विज्ञान आणि अभियांत्रिकी, पश्चिम बंगाल
  • ए वेलु आनंदा चारी - कला, तेलंगणा
  • राम चेत चौधरी - विज्ञान आणि अभियांत्रिकी, उत्तर प्रदेश
  • के चेल्लम्मल - अन्य - शेती, अंदमान -निकोबार
  • जोश्ना चिनप्पा - क्रीडा, तामिळनाडू
  • शेरलोट चॉपिन - अन्य - योग, फ्रान्स
  • रघुवीर चौधरी - साहित्य आणि शिक्षण, गुजरात
  • जो डी क्रुझ - साहित्य आणि शिक्षण, तामिळनाडू
  • गुलाम नबी दार - कला, जम्मू-काश्मीर
  • चित्त रंजन देबबर्मा - अन्य - अध्यात्म, त्रिपुरा
  • उदय विश्वनाथ देशपांडे - क्रीडा, महाराष्ट्र
  • प्रेमा धनराज, वैद्यकीय - कर्नाटक
  • राधाकृष्ण धिमान - वैद्यकीय, उत्तर प्रदेश
  • मनोहर कृष्णा डोळे - वैद्यकीय, महाराष्ट्र
  • पेरी सिल्व्हेन फिलिओझात - साहित्य आणि शिक्षण, फ्रान्स
  • महाबीर सिंग गुड्डू - कला, हरियाणा
  • अनुपमा होस्करे - कला, कर्नाटक
  • याझदी माणेकशा इटालिया - वैद्यकीय, गुजरात
  • राजाराम जैन - साहित्य आणि शिक्षण,उत्तर प्रदेश
  • जानकीलाल - कला, राजस्थान
  • रतन कहार - कला, पश्चिम बंगाल
  • यशवंतसिंग कथोच - साहित्य आणि शिक्षण, उत्तराखंड
  • जहिर काझी - साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र
  • गौरव खन्ना - क्रीडा, उत्तर प्रदेश
  • सुरेंद्र किशोर - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता,बिहार
  • दासरी कोंडप्पा - कला, तेलंगणा
  • श्रीधर माकम कृष्णमूर्ती - साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक
  • यानुंग जामोह लेगो अन्य - शेती, अरुणाचल प्रदेश
  • जॉर्डन लेपचा - कला, सिक्कीम
  • सतेंद्रसिंग लोहिया - क्रीडा, मध्य प्रदेश
  • बिनोद महाराणा - कला, ओडिशा
  • पूर्णिमा महतो - क्रीडा, झारखंड
  • उमा माहेश्वरी डी - कला, आंध्र प्रदेश
  • दुखू माझी - समाजसेवा, पश्चिम बंगाल
  • रामकुमार मल्लिक - कला, बिहार
  • हेमचंद मांझी - वैद्यकीय, छत्तीसगड
  • चंद्रशेखर महादेवराव मेश्राम - वैद्यकीय, महाराष्ट्र
  • सुरेंद्र मोहन मिश्रा (मरणोत्तर) - कला, उत्तर प्रदेश
  • अली मोहम्मद आणि गनी मोहम्मद - कला, राजस्थान
  • कल्पना मोरपरिया - उद्योग, महाराष्ट्र
  • चामी मुर्मू - समाजसेवा, झारखंड
  • ससिंद्रन मुथुवेल - सार्वजनिक कार्य, पापुआ न्यू गिनी
  • जी नचियार - वैद्यकीय, तामिळनाडू
  • किरण नाडर - कला, दिल्ली
  • पाकरावूर चित्रण नंबुदिरीपाद (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण, केरळ
  • नारायणन ई.पी - कला, केरळ
  • शैलेश नायक - विज्ञान आणि अभियांत्रिकी, दिल्ली
  • हरीश नायक (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण, गुजरात
  • फ्रेड नेग्रिट - साहित्य आणि शिक्षण, फ्रान्स
  • हरी ओम - विज्ञान आणि अभियांत्रिकी, हरियाणा
  • भागाबत पाधान - कला, ओडिशा
  • सनातन रुद्र पाल - कला, पश्चिम बंगाल
  • शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर - समाजसेवा, महाराष्ट्र
  • राधे श्याम पारीक - वैद्यकीय, उत्तर प्रदेश
  • दयाल मावजीभाई परमार - वैद्यकीय, गुजरात
  • बिनोद कुमार पसायत - कला, ओडिशा
  • सिल्बी पासा - कला, मेघालय
  • शांती देवी पासवान व शिवन पासवान - कला, बिहार
  • संजय अनंत पाटील अन्य - शेती, गोवा
  • मुनी नारायण प्रसाद - साहित्य आणि शिक्षण, केरळ
  • के.एस.राजण्णा - समाजसेवा, कर्नाटक
  • चंद्रशेखर चन्नपट्टण राजन्नाचार - वैद्यकीय, कर्नाटक
  • भगवतीलाल राजपुरोहित - साहित्य आणि शिक्षण, मध्य प्रदेश
  • रोमलो राम - कला, जम्मू-काश्मीर
  • नवजीवन रस्तोगी - साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश
  • निर्मल ऋषी - कला, पंजाब
  • प्राण सभरवाल - कला पंजाब
  • गद्दम समैया - कला, तेलंगणा
  • संगथनकिमा - समाजसेवा, मिझोराम
  • मच्छिहन सासा - कला, मणिपूर
  • ओमप्रकाश शर्मा - कला, मध्य प्रदेश
  • एकलव्य शर्मा - विज्ञान आणि अभियांत्रिकी, पश्चिम बंगाल
  • राम चंदर सिहाग - विज्ञान आणि अभियांत्रिकी, हरियाणा
  • हरबिंदर सिंग - क्रीडा, दिल्ली
  • गुरविंदर सिंग - समाजसेवा, हरियाणा
  • गोदावरी सिंह - कला, उत्तर प्रदेश
  • रविप्रकाश सिंह - विज्ञान आणि अभियांत्रिकी, मेक्सिको
  • शेषमपट्टी टी शिवलिंगम - कला, तामिळनाडू
  • सोमन्ना - समाजसेवा, कर्नाटक
  • केथवथ सोमलाल - साहित्य आणि शिक्षण, तेलंगणा
  • शशी सोनी - उद्योग, कर्नाटक
  • उर्मिला श्रीवास्तव - कला, उत्तर प्रदेश
  • नेपाल चंद्र सूत्रधर (मरणोत्तर) - कला, पश्चिम बंगाल
  • गोपीनाथ स्वेन - कला, ओडिशा
  • लक्ष्मण भट्ट तैलंग - कला, राजस्थान
  • माया टंडन - समाजसेवा, राजस्थान
  • अस्वती थिरुनल गौरी लक्ष्मीबाई थमपुरट्टी - साहित्य आणि शिक्षण, केरळ
  • जगदीश लाभशंकर त्रिवेदी - कला, गुजरात
  • सनो वामुझो - समाजसेवा, नागालँड
  • बालकृष्ण सदनम् पुथिया वेतील - कला, केरळ
  • कुरेल्ला विठ्ठलाचार्य - साहित्य आणि शिक्षण, तेलंगणा
  • किरण व्यास - अन्य - योग, फ्रान्स
  • जागेश्वर यादव - समाजसेवा, छत्तीसगड
  • बाबू राम यादव - कला, उत्तर प्रदेश

आणखी वाचा : 

PM Narendra Modi : भाजपचा जाहीरनामा कसा असावा? NaMo अ‍ॅपद्वारे थेट पंतप्रधान मोदींना पाठवा सूचना

Watch Video : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम

Lok Sabha Elections 2024 : या तारखेला होणार का लोकसभा निवडणुका? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले उत्तर