Cash Holding: 100-200 च्या नोटांची अचानक मागणी का वाढली? जाणून घ्या अधिक...
Cash Holding: डिजिटल पेमेंटच्या जमान्यातही लोक आता 100 आणि 200 रुपयांच्या नोटा घरी जास्त प्रमाणात का ठेवत आहेत? यामागे नक्की काय कारण आहे, चला जाणून घेऊया.
15

Image Credit : Asianet News
भारतात नवा ट्रेंड
सध्या भारतात डिजिटल पेमेंटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण, तरीही एक नवीन ट्रेंड दिसून येतोय. लोक आता पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात 100 आणि 200 रुपयांच्या नोटा घरी ठेवत आहेत. त्यामुळे या लहान नोटांची मागणी का वाढली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : our own
जागतिक आर्थिक अनिश्चितता
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे लोक खबरदारीचा उपाय म्हणून थोडी रोकड हातात ठेवणं पसंत करत आहेत. डिजिटल पेमेंटचा वापर वाढला असला तरी, आणीबाणीच्या काळात कॅश सोयीची ठरते, हा यामागचा मुख्य विचार आहे.
35
Image Credit : our own
डिजिटल व्यवहार
कोरोना महामारीनंतर ही सवय पुन्हा वाढल्याचं दिसून येतंय. अनपेक्षित परिस्थितीत बँकिंग सेवा किंवा इंटरनेट बंद पडल्यास, हातातील रोकड तात्काळ गरजा पूर्ण करण्यास मदत करेल, असं अनेकांना वाटतं. पण याचा अर्थ लोकांनी बँकिंग किंवा UPI वरचा विश्वास गमावला आहे, असा होत नाही.
45
Image Credit : our own
भारतीय रिझर्व्ह बँकेंचे स्पष्टीकरण
दरम्यान, 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा कोणताही अधिकृत तुटवडा नाही. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि बँकिंग सिस्टीममध्ये पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध असल्याचं सांगितलं जातंय. सध्याची वाढलेली मागणी ही लोकांच्या खबरदारी म्हणून रोख रक्कम ठेवण्याच्या सवयीचं प्रतिबिंब मानलं जातंय.
55
Image Credit : Asianet News
सर्वोत्तम पद्धत
तज्ज्ञांच्या मते, रोजच्या खर्चासाठी आणि आणीबाणीच्या गरजांसाठी घरात ठराविक रक्कम रोख स्वरूपात ठेवणं उपयुक्त ठरू शकतं. पण, मोठी रक्कम घरात साठवण्याऐवजी बँक खात्यात आणि सुरक्षित डिजिटल गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये ठेवणं हीच सर्वोत्तम पद्धत मानली जाते.

