- Home
- Utility News
- Credit Card Cash Withdrawal : क्रेडिट कार्डवरुन पैसे काढत असाल तर या गोष्टी माहित असायलाच हव्यात, नाहीतर होईल नुकसान
Credit Card Cash Withdrawal : क्रेडिट कार्डवरुन पैसे काढत असाल तर या गोष्टी माहित असायलाच हव्यात, नाहीतर होईल नुकसान
मुंबई - क्रेडिट कार्डवरून पैसे काढणं म्हणजे जास्त व्याज आणि फी भरायला लागणं. यामुळे कर्जबाजारी व्हायची शक्यता असते. त्याऐवजी कमी व्याजाचं पर्सनल लोन किंवा बँक लोन घेणं जास्त फायदेशीर असल्याचं दिसून येतं. जाणून घ्या याच्याशी संबंधित सबकुछ..

कर्जबाजारी करू शकतं
आजकाल क्रेडिट कार्ड असणं सामान्य झालंय. गरजेच्या खर्चासाठी, ऑनलाइन खरेदीसाठी, रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यासाठी लोकं क्रेडिट कार्ड वापरतात. पण, योग्य पद्धतीने वापरलं नाही तर ते कर्जबाजारी करू शकतं. क्रेडिट कार्डवरून थेट पैसे काढणं ही मोठी चूक आहे.
३५% ते ४५% पर्यंत व्याज
काही लोकं एका कार्डवरून पैसे काढून दुसऱ्या कार्डचं कर्ज फेडतात. ही मोठ्या समस्येची सुरुवात असते. क्रेडिट कार्डवरून पैसे काढल्यापासूनच व्याज लागू होतं. हे व्याज ३५% ते ४५% पर्यंत असू शकतं. हे सामान्य कर्जावरील व्याजाच्या तिप्पट आहे.
कमी व्याजाचं पर्सनल लोन किंवा बँक लोन घेणं चांगलं
क्रेडिट कार्डवरून पैसे काढल्यावर व्याजमुक्त कालावधी नसतो. कार्डवरून थेट खर्च केल्यास ४५-५० दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळू शकतो. पण ATM मधून पैसे काढल्यास किंवा रोख रक्कम घेतल्यास त्याच दिवसापासून व्याज लागू होतं. त्याऐवजी कमी व्याजाचं पर्सनल लोन किंवा बँक लोन घेणं चांगलं.
२% ते ३% फी आकारली जाते
क्रेडिट कार्डवरून पैसे काढल्यावर रोख रक्कम काढण्याची फीही आकारली जाते. ही साधारणपणे २% ते ३% असते. त्यामुळे विविध शुल्क आणि जास्त व्याजामुळे कर्जबाजारी होता. घरासाठी कर्ज, गाडीचं कर्ज, पर्सनल लोन यांवर ८% ते १५% व्याज असताना, क्रेडिट कार्डवर ३५% ते ४५% व्याज असणं खूप तोट्याचं आहे.
योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं
क्रेडिट कार्ड असणं चूक नाही, पण ते योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. क्रेडिट कार्डवरून पैसे काढणं टाळा. हे कर्जबाजारी होण्याचं पहिलं पाऊल असू शकतं. गरज नसताना क्रेडिट कार्डवरून पैसे काढणं टाळल्याने जास्त व्याजाच्या ओझ्यापासून सुटका मिळते. आर्थिक सुरक्षिततेसाठी नियोजनबद्ध बँक कर्ज किंवा आणीबाणी निधीची बचत करणं चांगलं.

