दिल्लीमध्ये 3 ऑक्टोबरला आलेल्या भूकंपामुळे स्थानिक हादरले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार,भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी होती.
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. या मापकाच्या मदतीने भूकंपाची तीव्रता व मॅग्निट्यूडची माहिती समजण्यास मदत मिळते.
जेव्हा जमिनीतून कंपन सुरू होऊ लागतात, त्यावेळेस भूकंपलेखनयंत्राच्या (Seismograph) माध्यमातून भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज लावला जातो. यावरूनच भूकंपाच्या केंद्राचीही माहिती मिळते.
घर/इमारत कोसळण्यामागे भूकंपाव्यतिरिक्त अन्य कारणेही असू शकतात. भूकंपाचे केंद्र, त्याचे एपीसेंटर व तीव्रता या गोष्टीही कारणीभूत असतात
8 मॅग्निट्यूडहून अधिक तीव्र स्वरुपाचा भूकंप आल्यास इमारती कोसळण्याची भीती असते. पण जर भूकंपाच्या केंद्राजवळच इमारती असतील तर कमी तीव्रतेच्या भूकंपामध्येही नुकसान होऊ शकते.
रिपोर्टनुसार, रिश्टर स्केलवरील 2.5 आणि त्याहून कमी तीव्रतेचा भूकंप धोकादायक नसतात. 2.5 से 5.4 तीव्रतेचे भूकंप किरकोळ श्रेणीमध्ये मोजले जातात.
6-7 तीव्रतेचा भूकंप अधिक लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्रासाठी धोकादायक ठरू शकतो. 7-7.09 तीव्रतेच्या भूकंपामध्ये इमारतींना तडे जाणे आणि इमारती कोसळणे अशी भीती असते.
भूकंपाची तीव्रता 7.09 पेक्षाही अधिक असेल तर अशा परिस्थिती बरेच नुकसान होण्याची शक्यता असते.