जळगाव लोकसभेत भाजपला मिळणार धक्का, उन्मेष पाटील ठाकरे गटात करणार प्रवेश

| Published : Apr 02 2024, 05:39 PM IST

unmesh patil

सार

जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. सध्याचे येथील खासदार उन्मेष पाटील यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होते.

जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. सध्याचे येथील खासदार उन्मेष पाटील यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होते. त्यामुळे आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचा पक्ष प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यांच्यासोबत पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करन पवार हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

उन्मेष पाटील यांची राजकीय कारकीर्द - 
उन्मेष पाटील यांची उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे उन्मेष पाटील हे नाराज होते. त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे ठरवले असे सांगण्यात येत आहे. त्यांनी 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि ते येथून आमदार म्हणून निवडून आले होते. 

स्मिता वाघ काय म्हटल्या? 
महाविकास आघाडीमध्ये जळगाव हा मतदार संघ शिवसेनेसाठी सुटलेला आहे. त्यामुळे येथून उन्मेष पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक असून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांचे संजय राऊत मित्र असल्यामुळे ते त्यांची भेट घ्यायला गेले होते असं त्यांनी म्हटलं आहे. ते पक्षप्रवेश करून दुसऱ्या पक्षात जातील असे मला वाटतं नसल्याचे यावेळी स्मिता वाघ यांनी म्हटलंय. 
आणखी वाचा - 
पतंजलीला जाहिरातीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिली चेतावणी, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण होते हजर
तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आजही आहेत? RBI च्या या 19 कार्यालयांमध्ये आजपासून करू शकता डिपॉझिट