सार

‘भारत जोडो न्याय’ यात्रेदरम्यान मध्यप्रदेशातील शाजापुर येथे भाजप (BJP) कार्यक्रत्यांसह नेत्यांनी राहुल गांधींच्या हातात बटाटे दिले. याशिवाय जयश्रीराम आणि मोदींच्या नावे घोषणाही केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra :  सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहेत. यादरम्यान, भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या हतात बटाटे देत जयश्रीराम आणि मोदींच्या नावाची घोषणा केल्याचे दिसून येत आहे.

राहुल गांधींच्या हातात दिले बटाटे
मध्यप्रदेशात मंगळवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा चौथा दिवस होता. यात्रेसाठी राहुल गांधी निघाले असता भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जयश्रीराम आणि मोदींच्या नावे घोषणा देण्यास सुरूवात केली. अशातच राहुल गांधी गाडीमधून खाली उतरत भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्या हातात बटाटे दिले गेले. यावरुन नेटकरी राहुल गांधीचे भाजपवर किती प्रेम आहे असा निशाणा साधत आहेत.

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
शाजापुरमध्ये भाजप सरकारवर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेत काही त्रुटी असल्याचे म्हटले. याशिवाय राहुल गांधींनी म्हटले की, याआधी एखाद्याला सैन्यात जायच असल्यास तेव्हा सैन्याकडूनही त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली जायची. एखादा शहीद झाला तरीही त्याला शहीदचा दर्जा दिला जायचा. पण आता भाजपच्या मोदी सरकारने अग्निवीर योजना आणल्याने सैनिकांमध्ये भेदभाव केला जात आहे. सैनिकांचे देखील दोन प्रकार झाले आहेत. कोरोनाच्या काळात दीड लाख तरुण सैन्यासाठी निवडण्यात आले होते. पण आजवर तरुणांना सैन्यात भरती करून घेतलेले नाही. तीन वर्ष फिरत राहिल्यानंतरही त्यांचे मार्ग बंद केलेत. अशातच तरुणांची काय चुकी होती? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थितीत केला.

आणखी वाचा : 

'भारत देश नाही केवळ...', DMK नेते ए राजा यांनी पुन्हा केली वादग्रस्त टिप्पणी (Watch Video)

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले - कुटुंबातील सदस्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी राजवाडे बांधले

Lok Sabha Elections 2024 : विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमध्ये कोणते पक्ष आणि कोणाकडे किती सदस्य? वाचा संपूर्ण यादी