सार
द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेते ए राजा आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा डीमकेच्या नेत्याने देश विरोधी विधाने दिल्याने खळबळ उडाली आहे.
A Raja Controversy : द्रविड मुनेत्र कळघम (DMK) पक्षाचे नेते ए राजा (A Raja) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. भारतासंबंधित डीएमके नेते ए राजा यांनी म्हटले की, "भारत एक देश नाही. ही गोष्ट व्यवस्थितीत समजून घ्या. भारत कधीच एक देश नव्हता. भारत एक देश नव्हे एक उपखंड आहे."
ए राजा यांचे विधान अशावेळी समोर आलेय ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 4 मार्चला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधि स्टॅलिन यांनी सनातन विरोधी विधानावर चांगलेच सुनावत म्हटले होते की, “त्यांनी केलेल्या विधानाचे काय पडसाद उमटतील हे माहिती असायला पाहिजे. याशिवाय तुम्ही आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आणि तुम्ही दिलासा देण्याची मागणी करताय. तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती नाहीत, एक राजकीय नेते आहात.”
मकडाशी केली भगवान हनुमानांची तुलना
डीएमके नेते ए राजा व्हिडीओमध्ये बोलत आहेत की, "जर तुम्ही म्हणत असाल हे तुमचे देव आहेत आणि भारत माता की जय तर आम्ही त्या देवासह भारत मातेचा स्विकार करणार नाही. त्यांना सांगावे, अम्ही सर्वजण रामाचे शत्रू आहोत. याशिवाय मला रामायण आणि भगवान राम यांच्यावर विश्वास नाही." ऐवढेच नव्हे ए राजा यांनी भगवान हनुमान यांची तुलना माकडासोबत करत 'जय श्री राम' च्या घोषणा घृणास्पद असल्याचे म्हटले.
नक्की काय म्हणाले ए राजा?
माजी केंद्रीय मंत्री ए जारा यांनी वादग्रस्त विधान करत म्हटले की, "भारत कधीच एक देश नव्हता. देशाचा अर्थ असा होतो की, एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तेव्हाच एक देश निर्माण होतो. भारत देश नव्हे एक उपखंड आहे."
भारत उपखंड असण्यामागील कारण सांगत ए राजा यांनी म्हटले की, "येथे तमिळ एक राष्ट्र आणि एक देश आहे. मल्याळम एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. उडिया एक राष्ट्र, एक भाषा आणि एक देश आहे. हे सर्व राष्ट्र मिळून एक भारत तयार होतो. यामुळे भारत देश नसून एक उपखंड आहे."
प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी
ए राजा यांनी पुढे म्हटले की, येथे वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृती आहे. जर तुम्ही तमिळनाडू येथील असाल तर तेथे एक संस्कृती आहे. केरळाची संस्कृती वेगळी आहे. दिल्लीची संस्कृती वेगळी आहे. पुढे ए राजा यांनी म्हटले की, अशाप्रकारे काश्मीरमध्येही एक संस्कृती आहे. त्याचा स्विकार करावा. याशिवाय ए राजा यांच्या वादग्रस्त विधानांचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा :