Bengaluru Tech Couple Loses Gold : बंगळूरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याच्या घरात चोरी झाली आहे. हे दाम्पत्य चहा पिण्यासाठी बाहेर गेले असताना ही घटना घडली. बंगळूरमधील एका अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला आहे. नक्की काय घडलं? 

Bengaluru Tech Couple Loses Gold : चहा पिण्यासाठी कॅफेमध्ये गेलेली वेळ साधून चोरट्यांनी घरातील सोने-चांदी लंपास केल्याची घटना घडली आहे. होय, बंगळूरमधील एचआरबीआर लेआउटमध्ये (HRBR Layout) राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्यासोबत हा प्रकार घडला. ते संध्याकाळी चहा पिण्यासाठी जवळच्या कॅफेमध्ये गेले असता, त्यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यात आल्याचे वृत्त आहे.

घटनेचे तपशील

एचआरबीआर लेआउटच्या दुसऱ्या ब्लॉकमधील बालाजी जी (34) यांच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही चोरी झाली. शनिवारी सायंकाळी 4:30 ते 6:30 च्या दरम्यान ही घटना घडली.

हे सॉफ्टवेअर दाम्पत्य घराला कुलूप लावून चहा पिण्यासाठी जवळच्या कॅफेमध्ये गेले होते. सायंकाळी 6.30 वाजता ते घरी परतले असता, त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता, बेडरूममधील कपाटे उघडी होती आणि त्यातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

घरातून सुमारे 250 ग्रॅम सोन्याचे दागिने, देवघरातील 300 ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. अपार्टमेंट आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच, चोरट्यांचा शोध सुरू आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 आणि 331 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.